शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या शाळा - निरोगी मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

माझ्या विद्यार्थी – शिक्षक मित्रांनो, आपली शाळा सुंदर असावी, शाळेच्या परिसरात जाताच प्रसन्न वाटावं असं तुम्हा प्रत्येकालाच वाटत असतं. ...

माझ्या विद्यार्थी – शिक्षक मित्रांनो,

आपली शाळा सुंदर असावी, शाळेच्या परिसरात जाताच प्रसन्न वाटावं असं तुम्हा प्रत्येकालाच वाटत असतं. पण साऱ्याच शाळा अशा नसतात आणि त्या तशा बनविण्यासाठी तुम्ही किंवा काही शिक्षक प्रयत्न करत असतीलच तर ते तुम्हा एकट्याला शक्य होईलच असंही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांना हवी अशी हरित शाळा परिसर बनविण्यासाठी एका मोठ्या संस्थेने कामाला सुरवात केली आहे. त्या संस्थेच नावंय क्लायमेट रियालिटी प्रोजेक्टच्या. ही संस्था आता महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन हे काम सुरु करतेय.

आपल्या पृथ्वीचं सतत वाढणारं तापमान चिंतेत पाडणारं आहे ना? मग, यावर उपायही आपणच केला पाहिजे हे क्लायमेट रियालिटी प्रोजेक्टच्या इंडिया ब्रँचने (सी आर पी - इंडिया) ठरवले आणि सुरु झाला ‘हरित शाळा परिसर’ हा कार्यक्रम! यात आत्तापर्यंत ५० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांनी नावनोंदणी करून कामाला सुरुवातही केली. शाळापरिसर हरित ठेवण्यासाठी काय काय करायचे याचे प्रशिक्षणही सी आर पी – इंडियाने आजपर्यंत ८ हजारांहून अधिक शिक्षकांना दिले आहे आणि त्याचा फायदा केवळ त्यात्या शाळांनाच नव्हे तर सर्वांनाच मिळतो आहे. सी आर पी – इंडिया ही संस्था केवळ शाळांनाच नव्हे तर समाजातील सर्व घटकांना तापमानवाढ आणि हवामानबदल याविषयी जागरूक ठेवण्याचे काम करत आहे.

आपली शाळा हरित कशी करायची, फक्त झाडे लावली तर पुरेसे आहे का? तर मित्रांनो, काही ठराविक गोष्टी त्यासाठी करणे अतिशय आवश्यक आहे.

१. सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे म्हणजेच सौरपत्रे बसवून घेणे आणि शाळेत गरज असेल त्या सर्व ठिकाणी एलइडी दिवे बसविणे

२.पर्जन्यजलसंधारण करताना पावसाचे हे पाणी नलिकाविहिरीत सोडून भूगर्भातील पाणीपातळी वाढवण्यास मदत करणे , पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा प्रयत्न करणे, शाळेच्या आवारातले गळके नळ तातडीने बदलणे आणि पाणी वाचवणारे नळ सर्वजागी बसवणे, झाडांना कमी पाण्यात हिरवेगार ठेवून चांगले वाढण्यासाठी तुषार सिंचनव्यवस्था शाळेच्या परिसरात बसवून वापरणे

३. कचरा व्यवस्थापन आणि खतनिर्मिती- यात ओला आणि कोरडा कचरा वेगळा ठेवण्याची व्यवस्था करणे आणि ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करून त्याचा वापर शाळेतील व परिसरातील झाडांसाठी करणे

४. शाळेत मिळणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाचा आणि नैसर्गिक हवेचा जास्तीत जास्त वापर करून घेण्याचे ठरवून तशी अंमलबजावणी करणे

५. जैवविविधतेचा विचार करून आपल्या परिसरात रुजणारे–वाढणारे वृक्ष, फळझाडे–फुलझाडे लावून जोपासना करणे तसेच शाळेच्या परिसरात वनौषधी उद्यान, भाजीपाला बगीचा, फुलपाखरू उद्यान आदी तयार करून या सगळ्या वनस्पती विद्यार्थ्यांना ओळखायला शिकवणे आणि त्यांचा परिसराला व आपल्याला होणारा उपयोग समजावून सांगणे.

या पाच घटकांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षकांना तसे प्रशिक्षण देण्याचे काम क्लायमेट रियालिटी प्रोजेक्ट इंडिया ब्रँच करत आहे आणि त्याचे चांगले परिणाम विद्यार्थी–शिक्षकच नव्हे तर परिसरात राहणाऱ्या सर्वांनाच अनुभवायला मिळत आहेत. नैसर्गिक राहणीमानावर भर दिल्याने आजार कमी होऊन शरीर व मन निरोगी राहणे, वृक्षांमुळे पक्ष्यांची किलबिल ऐकायला मिळणे. एकूण काय तर, पृथ्वी फक्त माणसांचीच नसून सगळ्या सजीवांची आहे ही जाणीव होणे असे अनेक फायदे शाळांना व पर्यायाने समाजाला होत आहेत. तुमच्या शाळेत हे उपक्रम सुरु करण्यासाठी शुभेच्छा!

--

१) फोटो : कॅम्पस फोल्डर - हरीतशाळा

फोटो ओळी - क्लायमेट रिॲलिटी प्रोजेक्टने दिल्ली येथील शाळेत निर्मिलेली हरितक्रांती

२) फोटो : कॅम्पस फोल्डर - राधिका कुलकर्णी