ग्रामप्रज्ञा उपक्रम राज्यात राबवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST2021-02-05T05:12:02+5:302021-02-05T05:12:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी ग्रामप्रज्ञा अॅम मोलाची भूमिका ...

Gram Pragya activities will be implemented in the state | ग्रामप्रज्ञा उपक्रम राज्यात राबवणार

ग्रामप्रज्ञा उपक्रम राज्यात राबवणार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी ग्रामप्रज्ञा अॅम मोलाची भूमिका बजावणार आहे. या अॅपमुळे शासनाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. बहुआयामी असलेला हा प्रकल्प राज्यात राबवणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

जिल्हा परिषेेतर्फे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी तसेच त्यांच्या कौशल्य विकासाठी ग्रामप्रज्ञा अॅप विकसीत करण्यात आले आहे. या मोबाईल अॅपचे उद्घाटन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते,

मुनश्रीफ म्हणाले, ग्रामविकास यंत्रणेत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण महत्वाचे असते. मात्र, यासाठी मोठा खर्च करावा लागतो. यात अनेक दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, या नव्या अॅपमुळे कर्मचाऱ्यांना ऑनलाईन घरबसल्या प्रशिक्षण घेता येणार असून त्यांच्या काैशल्यात वाढ होणार आहे.

मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असे हे अॅप आहे. या माध्यमातून शासनाचे अनेक परिपत्रक, निर्णय त्यांना या अॅपच्या द्वारे पाहता येणार आहे. निर्णय घेतांना एखादी अडचण आल्यास याचा वापर करून त्यांना ती समस्या सोडवता येणार आहे. या अॅपमध्ये ऑनलाई प्रश्नसंच, व्हिडीओ तसेच शासन परिपत्रक आणि अध्यादेश राहणार आहेत. हे प्रश्नन सोडवणे कर्मचाऱ्यांना कौशल्य वृद्धीसाठी आवश्यक असणार आहे. या अॅपचा ग्रामसेवकांना चांगला फायदा होणार आहे.

फोटो : ग्रामप्रज्ञा अॅपचे उद्घाटन करतांना हसन मुश्रीफ व अधिकारी

Web Title: Gram Pragya activities will be implemented in the state