शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकाही होणार प्रतिष्ठेच्या

By admin | Updated: June 30, 2015 23:10 IST

इंदापूर तालुक्यामध्ये आॅगस्ट महिन्यात ६२ ग्रामपंचयातींच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे गावागावांतील वातावरणात आतापासूनच राजकीय रंग भरू लागला आहे.

पळसदेव : इंदापूर तालुक्यामध्ये आॅगस्ट महिन्यात ६२ ग्रामपंचयातींच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे गावागावांतील वातावरणात आतापासूनच राजकीय रंग भरू लागला आहे. पक्षविरहित पॅनल होत असताना राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याचा प्रत्यय येत आहे. तसेच, ग्रामपंचायत निवडणुकादेखील आता प्रतिष्ठेचा विषय ठरत असल्याने अनेक बड्या नेत्यांकडे पॅनलच्या बैठका झडत आहेत. इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीपासून विविध सहकारी संस्था असो वा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असोत, त्या चुरशीच्याच होतात. पक्षापक्षांतील तालुकास्तरीय नेत्यांचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांवरच आगामी काळातील राजकीय गणिते ठरतात. त्यामुळे या निवडणुकांनाही आता महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यात निवडणुका होत असलेल्या ६२ ग्रामपंचायतींमध्ये अनेक मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे आतापासूनच उमेदवार कोण निवडायचे, विरोधी पॅनलचे उमेदवार कोण असतील, याबाबतची चाचपणी सुरू आहे. सत्ताधारी असणाऱ्यांची आता जिरवायची, असाही विरोधातील सूर अनेक गावांमध्ये उमटताना दिसत आहे. तसेच, या वेळी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ज्या पॅनलमधून हमखास निवडून येण्याची शाश्वती आहे, त्या पॅनलमधून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांकडून लॉबिंग करण्यात येत आहे. तर, काहींनी मतदारांना अकर्षित करण्यासाठी जेवणावळी सुरू केल्या आहेत. विविध प्रलोभनेही दाखवली जात आहेत. तालुक्यामध्ये भादलवाडी, अकोले, पोंधवडी, पिंपळे, शेटफळगढे, निरगुढे, सणसर, लासुर्णे, पळसदेव, वालचंदनगर, कळस, रुई, अंथुर्णे, निमगाव केतकी, भरणेवाडी या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. (वार्ताहर)