शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारची टाेलवा टाेलवी ; अजित पवारांचा अाराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 17:03 IST

भारतीय जनता पक्षाचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवा टोलवी करत असल्याचा अाराेप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला अाहे.

पुणे: राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवा टोलवी करत आहे.तसेच केवळ भावनिक मुद्यांना हात घालून निवडणूका लढविण्याचे काम सत्ताधा-यांकडून सुरू आहे,अशी टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केली. तसेच कर्जमाफीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचाही पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

   राज्यात परतीचा पाऊस न पडल्यामुळे अनेक जिल्ह्यात व तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असूनही राज्य शासनातर्फे दुष्काळ जीहीर केला जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पवार म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला निधी कमी पडू देणार नाही,अशी घोषणा शिर्डीतील कार्यक्रमात केली. मात्र,केंद्राच्या समितीने पाहणी केल्यानंतरच दुष्काळ जाहीर केला जाईल,असे राज्य शासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाकडून वेळकाढूपणा केला जात आहे. मात्र, राज्य शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी द्यावी. तसेच प्रत्येक शेतक-याला तात्काळ एकरी 50 हजार रुपये मदत करावी. बेरोजगारांना रोजगार द्यावा. अघोषित भारनियमन बंद करावे,आदी मागण्यांचे निवेदन पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्तांना दिले जाणार आहे. कर्जमाफीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी केला आहे.मात्र,सत्तेत असणा-या सत्ताधारी पक्षाने असा आरोप करणे योग्य नाही.शिवसेनेच्या नेत्यांनी याचा जाब विचारणे आवश्यक आहे,असेही पवार म्हणाले.  

धमक असेल तर उद्धव ठाकरेंनी राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी : अजित पवार

जलयुक्त शिवार योजनेतील भष्टाचार भाजप सरकारच्या वतीने टँकरमुक्त महाराष्ट्राची वल्गना करण्यात आली.त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र,जलयुक्त शिवारची कामे झाली त्याच ठिकाणी भूगर्भातील पाणी पातळी एक ते दीड मिटरने कमी झाली असल्याचा अहवाल शासनाच्याच भूजल सर्वेक्षण विभागाकडून दिला जात आहे.त्यामुळे शासनाचे जलयुक्त शिवार अभियान पूर्णपणे अपयश आहे. कुठे भ्रष्टाचार झाला याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे.दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहुर्त काढायचा आहे का? महाराष्ट्रात या पुढील काळात पाऊस पडणार नाही,असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनाने कोणाचीही वाट न पहाता दुष्काळ जाहीर केला पाहिजे. कर्नाटक सरकारकडून कर्नाटक राज्यात दुष्काळ जाहीर केला जात असले तर महाराष्ट्रात दुष्काळ केला जात नाही,असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच दुष्काळी परिस्थितीत शासन शेतक-यांना मदत का करत नाही? सरसकट कर्जमाफी का देत नाही, असा सवाल उपस्थित करून भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करणारे,खोटे बोलणारे आणि लोकांना गाजर दाखविणारे सरकार असल्याची टिका पवार यांनी केली. तसेच जुन्नर ,खटाव सारखे अनेक तालुके दुष्काळी असूनही त्यांच्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश केला जात नसल्याबद्दल आक्षेप नोंदवला.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBJPभाजपाdroughtदुष्काळ