दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारची टाेलवा टाेलवी ; अजित पवारांचा अाराेप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 05:01 PM2018-10-22T17:01:42+5:302018-10-22T17:03:58+5:30

भारतीय जनता पक्षाचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवा टोलवी करत असल्याचा अाराेप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला अाहे.

government is taking time to announce drought in state; says ajit pawar | दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारची टाेलवा टाेलवी ; अजित पवारांचा अाराेप

दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारची टाेलवा टाेलवी ; अजित पवारांचा अाराेप

Next

पुणे: राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवा टोलवी करत आहे.तसेच केवळ भावनिक मुद्यांना हात घालून निवडणूका लढविण्याचे काम सत्ताधा-यांकडून सुरू आहे,अशी टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केली. तसेच कर्जमाफीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचाही पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.


   राज्यात परतीचा पाऊस न पडल्यामुळे अनेक जिल्ह्यात व तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असूनही राज्य शासनातर्फे दुष्काळ जीहीर केला जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पवार म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला निधी कमी पडू देणार नाही,अशी घोषणा शिर्डीतील कार्यक्रमात केली. मात्र,केंद्राच्या समितीने पाहणी केल्यानंतरच दुष्काळ जाहीर केला जाईल,असे राज्य शासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाकडून वेळकाढूपणा केला जात आहे. मात्र, राज्य शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी द्यावी. तसेच प्रत्येक शेतक-याला तात्काळ एकरी 50 हजार रुपये मदत करावी. बेरोजगारांना रोजगार द्यावा. अघोषित भारनियमन बंद करावे,आदी मागण्यांचे निवेदन पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्तांना दिले जाणार आहे. कर्जमाफीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी केला आहे.मात्र,सत्तेत असणा-या सत्ताधारी पक्षाने असा आरोप करणे योग्य नाही.शिवसेनेच्या नेत्यांनी याचा जाब विचारणे आवश्यक आहे,असेही पवार म्हणाले.
  

धमक असेल तर उद्धव ठाकरेंनी राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी : अजित पवार

जलयुक्त शिवार योजनेतील भष्टाचार 
भाजप सरकारच्या वतीने टँकरमुक्त महाराष्ट्राची वल्गना करण्यात आली.त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र,जलयुक्त शिवारची कामे झाली त्याच ठिकाणी भूगर्भातील पाणी पातळी एक ते दीड मिटरने कमी झाली असल्याचा अहवाल शासनाच्याच भूजल सर्वेक्षण विभागाकडून दिला जात आहे.त्यामुळे शासनाचे जलयुक्त शिवार अभियान पूर्णपणे अपयश आहे. कुठे भ्रष्टाचार झाला याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहुर्त काढायचा आहे का? 
महाराष्ट्रात या पुढील काळात पाऊस पडणार नाही,असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनाने कोणाचीही वाट न पहाता दुष्काळ जाहीर केला पाहिजे. कर्नाटक सरकारकडून कर्नाटक राज्यात दुष्काळ जाहीर केला जात असले तर महाराष्ट्रात दुष्काळ केला जात नाही,असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच दुष्काळी परिस्थितीत शासन शेतक-यांना मदत का करत नाही? सरसकट कर्जमाफी का देत नाही, असा सवाल उपस्थित करून भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करणारे,खोटे बोलणारे आणि लोकांना गाजर दाखविणारे सरकार असल्याची टिका पवार यांनी केली. तसेच जुन्नर ,खटाव सारखे अनेक तालुके दुष्काळी असूनही त्यांच्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश केला जात नसल्याबद्दल आक्षेप नोंदवला.

Web Title: government is taking time to announce drought in state; says ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.