शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरला शासकीय आरोग्यसेवेची कोंडी; रिक्त पदे, अपूर्ण कामांमुळे रुग्णांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:32 IST

- अत्याधुनिक सुविधा असूनही सेवा मर्यादित; बावडा रुग्णालयावर विभागांतील वादाचा परिणाम

- शैलेश काटे

इंदापूर :
इंदापूर तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणेकडे अत्याधुनिक तपासणी साहित्य आणि सुविधा उपलब्ध असतानाही रिक्त पदे, अपूर्ण कामे आणि आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना समाधानकारक सेवा मिळण्यात अडचणी येत असल्याचे चित्र समोर आले आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात आणखी १६ उपकेंद्रांची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना महागड्या खासगी उपचारांचा पर्याय स्वीकारावा लागू नये, यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात येते. प्रशासनाकडून तालुक्यात इंदापूर शहरात उपजिल्हा शासकीय रुग्णालय, बावडा, निमगाव केतकी व भिगवण येथे ग्रामीण रुग्णालये तर सणसर, लासुर्णे, लोणी-देवकर, अंथुर्णे, बेलवाडी, वालचंदनगर (जंक्शन) व काझड यांसह दहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. लाखेवाडी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले असून, तालुक्यात सध्या ४६ उपकेंद्रे आहेत. निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण व माता-बालसंगोपन सेवांवर भर दिला जातो. 

बावडा ग्रामीण रुग्णालय वादात

बावडा येथील साठ खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात क्ष-किरण विभाग, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधा व अतिदक्षता विभाग अशी अत्याधुनिक साधने उपलब्ध असली तरी आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील तांत्रिक वादामुळे अनेक दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. छताची गळती, ऑक्सिजन प्लांट बंद, स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि फायर अलार्म नसणे अशा समस्यांकडे आरोग्य विभागाने लक्ष वेधले आहे. गेल्या सात वर्षांत ३७ वेळा स्मरणपत्रे देण्यात आली असली तरी कामे न झाल्याने बावडा व आसपासच्या ३० ते ४० गावांतील रुग्णांना त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.  

आरोग्य केंद्र उपयुक्त

लोणी-देवकर औद्योगिकपरिसरातील कामगारांसाठी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपयुक्त ठरत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रक्त तपासण्या, बाह्य व आंतररुग्ण सेवा तसेच गरोदर महिलांचे लसीकरण मोफत दिले जाते.  

उपजिल्हा रुग्णालयात येते पावसाचे पाणी

इंदापूर शहरातील उपजिल्हा शासकीय रुग्णालय हे तालुक्यातील सर्वात मोठे रुग्णालय असून, येथे मोफत डायलिसिस, सिटीस्कॅन, गरोदर मातांची सोनोग्राफी, विविध कर्करोग तपासण्या तसेच हाडांच्या शस्त्रक्रिया अशा सुविधा उपलब्ध आहेत. मात्र रुग्णालय सखल भागात असल्याने पावसाळ्यात रस्त्यावरून येणारे पाणी तळमजल्यात साचते.
संरक्षण भिंत, प्रवेशद्वार आणि शवविच्छेदन गृहाचे काम अपूर्ण असून, या कामांसाठी सुमारे दीड कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगितले जाते. रुग्णालय प्रशासन गेल्या सहा महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात ८५ पदे रिक्त

इंदापूर तालुक्यातील आरोग्यसेवेचा मोठा भार मर्यादित कर्मचाऱ्यांवर पडत आहे. एकूण २६० मंजूर पदांपैकी ८५ पदे रिक्त आहेत. आरोग्यसेविका, आरोग्यसेवक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्तता असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या दोन वर्षात ४७० महिलांची प्रसूती झाली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात आणखी १६ उपकेंद्रांची आवश्यकता आहे.

तालुक्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Indapur's Public Health Service Grapples with Shortages, Incomplete Work, Affecting Patients

Web Summary : Indapur's public health system struggles with staff shortages and incomplete projects. Rural patients face difficulties due to lack of coordination, despite available facilities. Sixteen additional sub-centers are needed to serve the growing population.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेIndapurइंदापूर