शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात आढळले सोन्याचे कण

By admin | Updated: March 5, 2015 00:34 IST

महाराष्ट्रात नंदुरबार येथील प्रसिद्ध शनिमंदिराजवळ सोन्याचे कण आणि प्लॅटिनम असल्याचे संकेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) दिले आहेत.

पुणे : महाराष्ट्रात नंदुरबार येथील प्रसिद्ध शनिमंदिराजवळ सोन्याचे कण आणि प्लॅटिनम असल्याचे संकेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) दिले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात संशोधन केले जात आहे, असे जीएसआय मध्य विभागाचे प्रमुख असीम कुमार साहा यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.जीएसआयच्या १६५व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील जीएसआयच्या कार्यालयात रॉक गार्डन संग्रहालयाचे उद्घाटन साहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सहा पत्रकारांशी बोलत होते. या वेळी पुणे विभागाचे प्रमुख एम. एम. पवार उपस्थित होते.नागपूरपासून ७० किमी. अंतरावर असलेल्या परसोळी येथे सोने, तांबे आणि प्लॅटिनमचे कण असलेल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, अद्याप येथे कामास सुरुवात झालेली नाही, असे स्पष्ट करून सहा म्हणाले, की नंदुरबार परिसरातसुद्धा सोने व प्लॅटिनम असल्याचे संकेत मिळाले असून, जीएसआयतर्फे दोन वर्षांपासून त्यावर काम केले जात आहे. परंतु, हे संशोधन सध्या प्राथमिक पातळीवर असून, येथे किती साठा असण्याची शक्यता आहे, याबाबतचा तपशील सखोल संशोधनानंतर पुढे येणार आहे. (प्रतिनिधी)महाराष्ट्रात कोणताही प्रकल्प सूरू करण्यापूर्वी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे,असे महाराष्ट्र शासनाच्या गॅझेट मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे या पुढील काळात भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यापूर्वी जीएसआयची परवानगी घ्यावी लागणार आहे. - असीम कुमार साहा,जीएसआय, प्रमुख, मध्य विभाग पावसामुळे माळीण दुर्घटना४माळीण दुर्घटनेच्या प्रस्तावाबाबत माहिती देताना साहा म्हणाले, की डोंगराला असणारा उतार, मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस यामुळेच ही दुर्घटना घडली असल्याचा अहवाल जीएसआयने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला असून, त्यांनी तो स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या काही संवेदनशील स्थळाची पाहणी आम्ही केली असून, त्यातील धोक्याच्या ठिकाणांची माहिती जीएसआयने संबंधित विभागाला कळविली आहे.