'ती ऑर्डर आम्हालाच दे', झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:37 IST2025-10-03T12:36:31+5:302025-10-03T12:37:49+5:30
लाकडी दांडक्याने डिलिव्हरी बॉयला मारहाण केली व त्यांच्या जवळील जेवण व विवो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेऊन गेले होते

'ती ऑर्डर आम्हालाच दे', झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अटक
लोणी काळभोर: जेवणाची ऑर्डर घेऊन आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मारहाण करून त्याच्या मोबाईल चोरून नेल्याची घटना बुधवारी(दि.१) दुपारी चार वाजता कदमवाकवस्ती हद्दीतील झुडिओ समोर घडली. लोणी काळभोरपोलिसांनी दिली या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात स्वप्नील ईश्वर काळे (वय -३७, रा. गोपाळपट्टी, हडपसर )यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी हॉटेल वृंदावन येथून जेवणाचे पार्सल घेऊन काळे हे कदमवाकवस्ती येथील झुडिओ समोर सेवा रस्त्यावर आले. त्याठिकाणी ऑर्डर देणारे स्वप्नील बंगले व इतर दोघांनी ही ऑर्डर रद्द कर म्हणत ती ऑर्डर आम्हालाच दे म्हणत लाकडी दांडक्याने फिर्यादी यांना मारहाण केली व त्यांच्या जवळील जेवण व विवो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेऊन गेले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी स्वप्नील भागवत बंगले (वय -२४,रा. भगवा चौक, सिद्राम मळा, लोणी काळभोर), रोहन अजिनाथ लोंढे (वय -२६, पाषाणकर बाग, लोणी काळभोर ),अजित शहाजी चांदणे ( वय -२१, गायकवाड वस्ती, कदमवाकवस्ती ) यांना अटक केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर करत आहेत.