शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसमोर जिलेटिनची नवी डोकेदुखी

By admin | Updated: September 21, 2015 04:07 IST

जिलेटिन कांड्या आणि डिटोनेटरचा वापर प्राणघातक हल्ल्यांसाठी होऊ लागल्यामुळे पोलिसांसमोर नवीन डोकेदुखी वाढली आहे. अगदी सहजतेने उपलब्ध होणारे

लक्ष्मण मोरे, पुणेजिलेटिन कांड्या आणि डिटोनेटरचा वापर प्राणघातक हल्ल्यांसाठी होऊ लागल्यामुळे पोलिसांसमोर नवीन डोकेदुखी वाढली आहे. अगदी सहजतेने उपलब्ध होणारे हे स्फोटक साहित्य आगामी काळात धोकादायक ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत जिलेटिन कांड्यांचा वापर करून मोटारसायकलच उडवून देण्याचे आखण्यात आलेले कट चिंताजनक आहेत. त्यामुळे पोलिसांना आता जिलेटिन आणि डिटोनेटरच्या वितरणावर बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे.पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या दोन पदाधिकाऱ्यांना पोस्टाद्वारे डिटोनेटर व स्फोटके पावडर पाठवण्यात आल्याच्या दोन घटना अगदी ताज्या आहेत. या घटनांचा पोलीस तपास करत आहेत. यासोबतच ३ सप्टेंबर रोजी नारायणगावमधील नंबरवाडी येथील शेतकरी देविदास बबन काळे (वय ३०) यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. पुणे शहरामध्ये सध्या पाच तर जिल्ह्यामध्ये २० पेक्षा अधिक जिलेटीन कांड्यांचे विक्रेते आहेत. केवळ परवाना धारक वितरकांमार्फतच याची विक्री बंधनकारक असून केवळ परवानाधारक ठेकेदारांनाच याची विक्री होणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागासह शहरालगतच्या भागात दगड खाणी आहेत. या खाणींमध्ये स्फोट घडवण्यासाठी मुख्यत्वे या कांड्यांचा वापर केला जातो. परंतु विक्रेते व वितरक मोठ्या प्रमाणावर याची खरेदी करत असल्यामुळे त्याच्या विक्रीवर कोणतेही नियंत्रण राहीलेले नाही. या कांड्यांवर कोणत्याही प्रकारचे सिरीयल क्रमांक आणि त्याच्या नोंदी नसतात. त्यामुळे या कांड्यांचा वापर कसा आणि किती होतो हे तपासणे अवघड होऊन बसले आहे.