शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या पुतळ्याभोवतालचा बगीचा गायब

By admin | Updated: February 16, 2015 23:32 IST

शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी केली आहे.

लेण्याद्री : छत्रपती शिवाजीमहाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर नगरपालिकेने उभारलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी केली आहे.शिवरायांचा पुतळा असलेल्या ट्राफिक आयलंडमधील बागबगीचा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. नगरपालिका प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी शिवनेरीवर येत असतात. शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या या पुतळ्यापाशी आवर्जून थांबून छायाचित्र काढली जातात. अशा वेळी या पुतळ्याच्या परिसराच्या विकासाबाबत नगरपालिका प्रशासन उदासीन असल्याने शिवप्रेमी नागरिकांमधून तीव्र संतापाची भावना आहे. शिवनेरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वीजवितरण कंपनीच्या कार्यालयासमोरील चौकात नगरपालिकेने सन २००२ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. या पुतळ्याभोवती ट्राफिक आयलंड उभारून त्यात शोभेची झाडे, छोटा बगीचा करून सुशोभीकरण करण्यात आले होते. मागील तीन -चार वर्षांपासून देखभालीअभावी या बगीच्याची रया गेलेली होती. (वार्ताहर)४वर्षभरापूर्वी नगरपालिकेच्या वतीने येथील बगीचा नव्याने तयार करण्यासाठी निविदा काढण्यात आलेली होती. परंतु बगीचा मात्र प्रत्यक्षात तयार करण्यात आलेलाच नव्हता. शिवरायांचा पुतळा उभारण्यात मोलाची भूमिका बजावणारे माजी नगराध्यक्ष विकास खोपे हे सध्या नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. पुतळा उभारण्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे असलेले हे नगरसेवक मात्र आता पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी कोणताही पुढाकार घेत नाहीत.