शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भलिंगनिदान करणारे जेरबंद

By admin | Updated: March 11, 2017 03:32 IST

बिरोबावाडी (ता. दौंड) येथे फिरत्या पथकाद्वारे गर्भलिंगनिदान चाचणी करणाऱ्यांची टोळी पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडली आहे. त्यांच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन

यवत : बिरोबावाडी (ता. दौंड) येथे फिरत्या पथकाद्वारे गर्भलिंगनिदान चाचणी करणाऱ्यांची टोळी पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडली आहे. त्यांच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, ८ मोबाईल, गर्भपात करण्याचे औषध व आलिशान मारुती सुझुकी सियाज कार पोलिसांनी जप्त केली आहे. या टोळीत रत्नागिरी येथे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या एका डॉक्टरचादेखील समावेश आहे.डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे (वय ४५, रा. लक्ष्मीनगर, फलटण), त्याचा मदतनीस हेमंत बबन आटोळे (वय ३५, रा. रावणगाव, ता. दौंड), चालक संपत आतारी (वय ४२, रा. फलटण) व सोमथान होले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी डॉ. रूपाली पाखरे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड, बारामती, इंदापूर व फलटण परिसरात बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान चाचणी करीत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस नाईक दशरथ कोळेकर, दीपक पालखे, मीनल शिवरकर, सविता धुमाळ यांनी सापळा रचला. ही कारवाई करण्यासाठी पोलिसांनी डॉ. रूपाली पाखरे, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. के. वाडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

- ही टोळी बिरोबाचीवाडी येथे सोपान होले यांच्या घरी ३ महिलांचे गर्भलिंगनिदान करणार असल्याचे समजल्यावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता, तेथे आरोपी डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे, मदतनीस हेमंत आटोळे, संपत आतारी हे गर्भलिंगनिदान चाचणी करताना रंगेहाथ आढळले. त्यांच्याकडून सोनोग्राफी मशीनसह गाडी, गर्भपात करण्याचे औषध व रोख ५९ हजार २६० रुपये, असा १३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.