पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने गुंडाचा तरुणावर कुऱ्हाडीने वार; पुणे शहरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 04:10 PM2022-11-05T16:10:58+5:302022-11-05T16:11:49+5:30

आरोपीला येरवडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे...

Gangster attacks youth with ax on suspicion of being a police informer; Incident in Pune city | पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने गुंडाचा तरुणावर कुऱ्हाडीने वार; पुणे शहरातील घटना

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने गुंडाचा तरुणावर कुऱ्हाडीने वार; पुणे शहरातील घटना

googlenewsNext

पुणे :पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने गुंडाने तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मोहसिन अन्वर खान (वय ३२, रा. जिजामाता नगर, नवी खडकी) असे या गुंडाचे नाव असून, येरवडापोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी ऋषीकेश किरण मोहिते (वय २१, रा. नवी खडकी, येरवडा) यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गुरुवारी दुपारी ४ ते रात्री ९ च्या दरम्यान घडला. मोहसिन खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. फिर्यादी हे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असताना मोहसिनने तो पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादीचे आई-वडील त्याला वाचविण्यासाठी आले असता आराेपीने त्यांच्याही अंगावर कुऱ्हाड उगारली. गर्दी हाेत असल्याचे पाहून हातातील कुऱ्हाड हवेत फिरवून दहशत निर्माण केली. पोलीस निरीक्षक गुरव तपास करीत आहेत.

Web Title: Gangster attacks youth with ax on suspicion of being a police informer; Incident in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.