शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल दरोडेखोरांची कोयता गँग गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : पेट्रोलपंपावर धाडसी दरोडा टाकून लूटमार करणारी आणि टूर्स-ट्रॅव्हल कारचालकाचा दृश्यम स्टाइल खून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : पेट्रोलपंपावर धाडसी दरोडा टाकून लूटमार करणारी आणि टूर्स-ट्रॅव्हल कारचालकाचा दृश्यम स्टाइल खून करणा-या कोयता गँगला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.

किरण भाऊसाहेब थिटे (वय २१, रा. केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे), गौरव बाळू ढवळे (वय २१, रा. खोपवस्ती, अष्टापूर, ता. हवेली), संतोष गोरख ब्राम्हणे (वय २०, रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर), भाऊसाहेब गौतम कुडुक (वय २२, रा. शेकटा, जिल्हा परिषद शाळेजवळ, ता. गेवराई, जि. बीड) व दक्षिणेस उर्फ दर्शन अनिल दांगट (वय २१, रा उंब्रज, दांगटपट, ता. जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

२८ डिसेंबरच्या मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास ५ दरोडेखोरांनी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बोरकरमळा येथील पेट्रोलपंपावर धारधार कोयते आणि लाकडी दांडके घेऊन पंपावरील कामगारांना जिवे मारण्याची धमकी देऊन जबरी दरोडा टाकला होता. या दरोड्यात २ हजार ५०० रुपये रोख व ३७ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल असा एकूण ३९ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तपास करीत होते. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा पोलिसांनी माग काढला. आरोपी हे रांजणगाव गणपती येथील असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचत रांजणगाव राजमुद्रा चौकात त्यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, लोणी काळभोर येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याची कबुली त्यांनी दिली. यासोबतच २ जाानेवारी रोजी रांजणगाव येथे या आरोपींनी फिरायला जाण्यासाठी रांजणगाव येथील टुरिस्टचा व्यवसाय करणारे चालक योगेश मच्छिंद्र गर्जे (वय २५, रा. रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे ) यांची कार चोरण्याचा प्रयत्न केला. योगेश यांनी विरोध केल्याने त्याच्या तोंडावर कोयत्याने वार करून तसेच दगडाने ठेचून त्यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी योगेश यांचे प्रेत गाडीच्या डिकीत ठेवून गाडी भवरापूर (ता. हवेली) येथील मुळा - मुठा नदी वरील पुलावर आणून पुलावरून योगेश याचे प्रेत नदीत फेकून दिले. पुढील तपासासाठी त्यांना लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, राजू मोमिन, जनार्दन शेळके, विजय कांचन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, धिरज जाधव, अक्षय नवले, समाधान नाईकनवरे यांनी ही कारवाई केली.