रेल्वेवर दरोडा टाकणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:20 IST2021-03-13T04:20:19+5:302021-03-13T04:20:19+5:30

प्रशांत पाटील ( वय १९) , अभिषेक पाटील ( वय २१ ), किरण पाटील ( वय २३ ) ...

The gang that robbed the train is gone | रेल्वेवर दरोडा टाकणारी टोळी गजाआड

रेल्वेवर दरोडा टाकणारी टोळी गजाआड

प्रशांत पाटील ( वय १९) , अभिषेक पाटील ( वय २१ ), किरण पाटील ( वय २३ ) , रविंद्र पाटील ( वय २१ ), योगेश पाटील ( वय २० ), शुभम पाटील ( वय २३ , सर्व राहणार रोकडे वागडू , ता. चाळीसगाव , जि. जळगाव ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी मनिषकुमार मंडल , (रा. मनीराजूरी , तासगाव जि. सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री दानापूर-पुणे रेल्वेमध्ये मनमाड रेल्वे स्थानकातून सहा तरूण पुण्याला येण्यासाठी जनरल बोगीत बसले. रात्री अडीच्या सुमारास ही रेल्वे अहमदनगर रेल्वे स्थानकातून निघाल्या नंतर या सहा तरुणांनी एका प्रवाशाला जबरी मारहाण करीत त्याच्याकडून चार हजार २०० रुपये घेतले. त्याचबरोबर इतर प्रवाशांना धमकावत म्हणाले की पैसे काढा नाही तर तुम्हाला अशीच मारहाण करु असे सांगत इतर तीन प्रवाशांकडून पैसे हिसकावून घेतले. यावेळी प्रवाशांकडून त्यांनी साडेआठ हजार रुपये घेतले. दरम्यान, प्रवाशांनी आरडाओरडा करु लागल्याने गस्तीला असलेले रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने चोरट्यांना ताब्यात घेऊन दौंड पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: The gang that robbed the train is gone