शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सीएसआरचा निधी जिल्ह्यालाच मिळावा

By admin | Updated: April 17, 2017 06:36 IST

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कंपन्यांचा सीएसआरचा निधी हा प्रामुख्याने स्थानिक पातळीवर मिळावा. तो इतर जिल्ह्यांना वळवू नये, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

पुणे : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कंपन्यांचा सीएसआरचा निधी हा प्रामुख्याने स्थानिक पातळीवर मिळावा. तो इतर जिल्ह्यांना वळवू नये, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. जलयुक्त शिवाराच्या कामात आत कंपन्याही आपला हातभार लावत आहेत. या कंपन्यांकडून जलयुक्त शिवारसाठी येणारा निधी (कार्पोरेट सोशल रिसपॉन्सिबिलिटी (सीएसआर) राज्य शासनाच्या वतीने इतर जिल्ह्यात वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा निधी इतर जिल्ह्यात जाऊ नये याकरिता शनिवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत सर्वानुमते ठराव करून त्यास मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे जोरदारपणे सुरू आहेत. त्यासाठी कंपन्याही पाणी अडविण्याच्या व जिरविण्याच्या मोहिमेत सहभाग घेत आहेत. काही कामेही कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून पूर्ण केली आहेत. दोन वर्षांत सीएआरच्या माध्यमातून ४०० कामे मार्गी लागली आहे. आत्तापर्यंत २५ कोटी ८५ लाख ६५ हजार रुपयांची कामे झाली आहेत. २०१५-१६ या वर्षात १२ कोटी ८८ लाख ८३ हजार रूपयांची १९९ कामे पूर्ण झाली. तर २०१६-१७ या वर्षात १२ कोटी ९६ लाख रूपयांची २०१ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवारच्या या कामांमुळे जिल्ह्याचा पाणीसाठा निश्चितच वाढण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवारची कामे करण्यासाठी जिल्ह्याला निधी मिळत आहे. मात्र, हा निधी शासन इतर जिल्ह्यांना वळविण्याच्या विचारधीन असल्याचा ठराव शनिवारी एका सदस्याने सर्वसाधारण सभेत मांडला. जिल्ह्यातील १९० गावांमध्ये २०१६-१७ साली जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ७ हजार ४९६ कामे करण्याचे नियोजन केले होते. मात्र, यापैकी अद्याप २ हजार ८३३ कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे सीएसआरचा निधी हा स्थानिक पातळीवरील कामासाठीचा मिळावा, अशी मागणी सदस्यांनी केली होती. (प्रतिनिधी)