शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवेळ कामाचा ३५० जणांना पूर्ण पगार

By admin | Updated: January 21, 2015 00:28 IST

महापालिकेच्या आरोग्य खात्यांतर्गत कीटक प्रतिबंधक विभागामध्ये कार्यरत असलेल्या ३५० जणांना अर्धवेळ कामाचा पूर्ण पगार गेल्या अनेक वर्षांपासून मिळत आहे.

दीपक जाधव - पुणेमहापालिकेच्या आरोग्य खात्यांतर्गत कीटक प्रतिबंधक विभागामध्ये कार्यरत असलेल्या ३५० जणांना अर्धवेळ कामाचा पूर्ण पगार गेल्या अनेक वर्षांपासून मिळत आहे. त्यांचे कामाचे तास वाढविण्याच्या प्रस्तावाची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही १ वर्ष उलटले, तरी आयुक्तांची मान्यता घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांवर पालिका दाखवत असलेल्या या विशेष मर्जीमुळे शहराच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. शहरामध्ये डासअळीनाशक, डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया या रोगांचा फैलाव होऊ नये, म्हणून कीटकनाशक व औषधांची फवारणी केली जाते. या कामाकरिता आरोग्य विभागाकडून ३५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी दीड अशी आहे. अवाढव्य पसारा असलेल्या पुणे शहराकरिता केवळ ३५० कर्मचारी नेमले आहेत. त्यांच्याकडूनही अर्धवेळच काम केले जाते.शहरातील कीटकनाशक फवारणीची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे आढळून आले आहे. सकाळी साडेसात वाजता कर्मचाऱ्यांनी कामावर येणे अपेक्षित असताना ते उशिरा कामावर येतात. बायोमेट्रिक हजेरीची पद्धत सुरू करण्यात आली आहे; मात्र हजेरी लावून कर्मचारी पसार होत असल्याचे आढळून येत आहे. सहा तासांच्या कामामध्ये दुपारचे जेवण, चहापान यांत त्यांचा वेळ जातो. त्यानंतर दीड वाजताच ते लगेच घरचा रस्ता पकडतात. त्यामुळे त्यांचे ड्युटीचे तास ६ वरून ८ करावेत, असा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यावर कामगार सल्लागार व प्रशासनाने सकारात्मक शेरे दिले आहेत. शहरामधील नदीकिनारे, खड्डे, बांधकामाची धूळ, नाले, गटारे या ठिकाणी महापालिकेकडून नियमित कीटकनाशक व औषध फवारणी केली जाते. मध्यंतरीच शहरात डेंगीचा फैलाव झाला होता. डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया अशा साथी अत्यंत वेगाने पसरतात. चुकून रोगाची उत्पत्ती झाल्यास त्याला अटकाव करणे खूप अवघड जाते. त्यामुळे औषधफवारणीची मोठी आवश्यकता आहे. मोठ्या शहरांमध्ये या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जाते. माननीयांचे नातेवाईककीटक प्रतिबंधक विभागामध्ये माननीयांचेच अनेक नातेवाईक कामाला लागले आहेत. त्यामुळे त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यास ते लगेच माननीयांकडे धाव घेत असल्याने ‘जे चालल्ांय ते चालू द्या’ अशी भूमिका वरिष्ठांना घ्यावी लागत आहे. त्यामुळे कामाचे तास वाढविण्याची फाईल पुढे सरकत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.कीटकनाशक प्रतिबंधक विभागातील कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे तास ६वरून ८ करावेत, याकरिता आरोग्य विभागानेच प्रस्ताव प्रशासनाकडे दिला आहे. त्यावर लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल.- एस. टी. परदेशी, प्रभारी आरोग्यप्रमुख