शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दागिने चोरणाऱ्या चौघांना अटक

By admin | Updated: February 21, 2017 03:04 IST

लग्नसमारंभासाठी घरात ठेवलेले ३७ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांना

पुणे : लग्नसमारंभासाठी घरात ठेवलेले ३७ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांना अटक केली़ नरेशकुमार केसाराम चौधरी (वय ४०, रा. सुखसागरनगर), अंबिका भगतसिंग मिझार (वय ३९, रा. बिबवेवाडी), राधिका चक्र सोनार (वय ३४, रा. कोंढवा रोड) आणि रेशमुन्निसा रफिद सय्यद (वय ४३, रा. स्वारगेट) अशी त्यांची नावे आहेत.याप्रकरणी दीपक उत्तमचंद जैन (वय ४७, रा. सॅलिसबरी पार्क) यांनी स्वारगेट पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १२ ते १६ फेबु्रवारी २०१७ दरम्यान जैन यांच्या राहत्या घरी घडली. जैन यांच्या आत्याचे मुलीचे लग्न असल्याने त्यांनी बँकेमधील ३७ लाख ८० हजार रुपये किमतीचे १.८९० किलो ग्रॅम वजनाचे दागिने काढून आणले होते व ते बेडरूममध्ये ठेवले होते. ते आरोपींनी चोरले. पोलिसांनी आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांचे कोणी साथीदार आहेत का, तसेच त्यांनी या प्रकारचा आणखी कोणता गुन्हा केला आहे का, याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.