शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
2
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
3
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
4
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
5
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
6
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
7
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
8
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
9
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
10
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
11
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
12
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
13
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
14
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
15
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
16
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
17
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
18
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
19
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
20
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या माजी उपसरपंचाची फॉर्च्यूनर कार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:12 IST

या गाडीवर सुमारे २३ हजारांचा दंड बुधवारी भरण्यात आला आहे, अशी महिती पोलिसांनी दिली.

वारजे : येथील वारजे वाहतूक विभागाने वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी एका माजी उपसरपंच यांची काळ्या रंगाची फॉर्च्युनर मोटारकार जप्त केली आहे. विशेष म्हणजे या गाडीवर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनंतर पुढाकार घेण्यात आला.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, (एमएच १२ व्हीएल २५४५) या नंबरची काळ्या रंगाची एक फॉर्च्युनर मोटार फर्ग्युसन रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी उभी असल्याचे आढळून आले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठवलेल्या या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाची ही गाडी असून त्याच्या सर्व काचादेखील पूर्णपणे काळ्या होत्या. या गाडीची मागच्या बाजूची नंबर प्लेटदेखील तुटलेली आढळून आली. त्यामुळे मागून गाडीची ओळख पटविणे अवघड होते. याबद्दल कोणीतरी सजग नागरिकाला हा काहीतरी वेगळा प्रकार झाला असल्याचे संशयातून त्यांनी याबाबतचा व्हिडीओ काढून पोलिस आयुक्तांना पाठवला.आयुक्तांनी याची दखल घेत तातडीने सूत्रे हलवली व गाडीची तपासणी केली असता ही गाडी वारजे वाहतूक विभागअंतर्गत एका माजी उपसरपंच अमोल कारले यांच्या नावावर असलेली आढळून आली. याबाबत अधिक माहिती घेतली असता या गाडीवर थोडे थोडे नव्हे तर प्रिंटेड ग्लास (म्हणजे काळ्या काचा), तसेच महामार्गावर अधिक वेगाने गाडी चालवणे (ओव्हर स्पीड) असा विविध कलमानुसार वाहतूक भंग केल्याबद्दल सुमारे २३ हजारांचा दंड या गाडीवर पेंडिंग असल्याचेदेखील आढळून आले. याबाबत पोलिस आयुक्त कार्यालयाने तातडीने वारजे वाहतूक विभागाला तसा निरोप कळवला वारजे वाहतूक विभागांनी या ठिकाणी ही गाडी ताब्यात घेतली असून या गाडीवर सुमारे २३ हजारांचा दंड बुधवारी भरण्यात आला आहे, अशी महिती पोलिसांनी दिली.

दरम्यान गाडीवर असलेला दंड भरून घेतला असून पोलिस आयुक्तांच्या सूचनेनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वारजे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम मिसाळ यांनी लोकमतला दिली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकsarpanchसरपंचTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसRto officeआरटीओ ऑफीस