शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्मीयांमुळे देशाची घडण

By admin | Updated: September 6, 2014 00:29 IST

भारताची संस्कृती सर्वसमावेशक आणि सहिष्णू आहे. या देशाची जडणघडण सर्व धर्मीयांच्या बलिदानाने झालेली आहे. त्यामुळे हा देश एकसंध ठेवण्याची जबाबदारी सर्वाची आहे.

पुणो : भारताची संस्कृती सर्वसमावेशक आणि सहिष्णू आहे. या देशाची जडणघडण सर्व धर्मीयांच्या बलिदानाने झालेली आहे. त्यामुळे हा देश एकसंध ठेवण्याची जबाबदारी सर्वाची आहे. अल् कायदाने प्रसारित केलेल्या व्हिडिओच्या आधारे धार्मिक भावना भडकावण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वानी एकत्र येणो आवश्यक असल्याचे मत पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी व्यक्त केले. 
अल् कायदाने प्रसिद्ध केलेल्या वादग्रस्त व्हिडिओनंतर पुणो पोलिसांच्या वतीने पुण्यातील मुस्लिम संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकत्र्याची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीला सहपोलीस आयुक्त संजय कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, अब्दुर रहमान, डॉ. शहाजी सोळुंके, परिमंडल एकचे उपायुक्त एम. बी. तांबडे, दोनचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक, सहायक आयुक्त प्रसाद हसबनीस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम आदी उपस्थित होते. 
यासोबतच सिरत कमिटी, नॅशनल पर्सनल लॉ कमिटी, जमैतुल उलेमा, बज्मे इस्लाम, इंडियन मुस्लिम फ्रंट, हजरत बाबाजान दर्गाह ट्रस्ट, अवामी महाज, जमैतुल कुरेश, मुस्लिम ओबीसी संघटना, बाबा फरीद यंग सर्कल, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, नाना पेठ सोशल फ्रंट, क्वार्टर गेट युथ कमिटी, या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 
आज प्रत्येकाला आपल्या पोटाची चिंता आहे. त्यामध्ये तरुणांना धर्माच्या नावावर फितवण्याचे काम काही समाजकंटकांकडून होत आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे हाणून पाडले पाहिजेत. यापुढे मुस्लिम तरुणांशी संवाद वाढवण्याची तसेच समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता आहे. तरुणांशी संवाद वाढवल्यास चुकत असलेली वाट सावरणो सोपे होईल. सोशल मीडियावर येणारे मेसेज, व्हिडिओ, फोटो हे खरे आहेत की खोटे हे तपासणो गरजेचे आहे. ते कोण टाकतो, कोठे बसून टाकतो याची माहिती नसतानाही आपल्या भावना भडकतात. जर तुमच्या आसपास कुठे तरुणांची हालचाल संशयास्पद वाटली, त्यांच्या वागण्यात बदल वाटला, बरेच दिवस न सांगता गायब झाला तर याची माहिती पोलिसांना द्या. सर्वानी शांतता राखा, यंत्रणांना सहकार्य करा, एकत्र राहा आणि एकता ठेवा, असे आवाहन माथूर यांनी केले.(प्रतिनिधी)
 
1‘अल् कायदा’ या दहशतवादी संघटनेने भारतात आणि विशेष म्हणजे अमदाबाद, काश्मीर आणि आसाममध्ये षडयंत्र आखून कार्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासोबत जिहादच्या नावाखाली देशात दहशतवाद पसरवण्याच्या केलेल्या घोषणोचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. 
2अल् कायदाने आजवर परदेशात इस्लामच्या नावाखाली दहशतवाद पसरवला. सुफी संतांची भूमी असलेल्या भारतामध्ये दहशतवाद पसरविण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. आपण सर्वजण मिळून त्यांच्या या षडयंत्रंना पायबंद घालूया. 
3आम्ही तमाम देशप्रेमी नागरिकांना आवाहन करतो, की त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आपले शहर आणि आपल्या परिसरात अनोळखी आणि संशयास्पद व्यक्ती दिसली तर तातडीने पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन सर्व मुस्लिम संघटनांनी केले आहे.