ख्रिसमसच्या दिवशी ८ लाखांचे विदेशी मद्य पकडले; पुण्यातील बाबजान चौक येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:55 IST2025-12-26T14:54:06+5:302025-12-26T14:55:50+5:30
एका चारचाकी गाडीतून विनापरवाना विदेशी मद्य विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती

ख्रिसमसच्या दिवशी ८ लाखांचे विदेशी मद्य पकडले; पुण्यातील बाबजान चौक येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
लष्कर : विक्रीसाठी चारचाकी गाडीतून घेऊन चाललेल्या स्कॉच आणि इतर विविध मद्यासह ९४ बाटल्या विदेशी मद्य सापळा रचून लष्कर भागातील बाबजान चौक येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडल्या. यावेळी राजेश बसंतनी, प्रकाश वसंतानी यांना ताब्यात घेतले. तेथील आठ लाख रुपयांचा अद्यासह तीन मोबाइल फोन आणि चारचाकी आर्टिगा गाडी जप्त करण्यात आली आहे.
याविषयी पुणे उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयाच्या निरीक्षक वसंत कौसडीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क निरीक्षक ए विभागाला मिळालेल्या माहितीनुसार बाबजान चौक येथून विनापरवाना विदेशी मद्य विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे बाबजान चौकात आपला सापळा रचून चारचाकीतून विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे राजेश वसंतानी आणि प्रकाश वसंतानी आढळून आले. त्यानंतर गाडीची तपासणी केली असता गाडीत प्रतिबंधित स्कॉच आणि इतर मद्याच्या एकूण ९४ बाटल्या आढळून आल्या. त्यानंतर तत्काळ मुद्देमाल जप्त करीत राज्य उत्पादन शुल्क एमपीए ॲक्टनुसार कलम ६५,८०,८१,८३,१०८ या विविध कलमानुसार कारवाई करत आठ लाख सहाशे एकोणसत्तर रुपयाच्या मद्यासह तीन मोबाइल आणि गाडी जप्त केली आहे.
ही कामगिरी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे व उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक आर. एस. माने, निरिक्षक व्ही. एस. कौसडीकर, निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक हितेश पवार, विजय सूर्यवंशी, किरण पाटील, दिनेश सूर्यवंशी, कर्मचारू पूजा किरतकुडवे, श्रीधर टाकळकर, अमोल यादव यांनी केली.