एलआयसी काढायला लावली; २ लाख, सोन्याची अंगठी मागितली, त्रासाला कंटाळून तरुणाची पोलिसात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:09 IST2025-11-27T15:08:31+5:302025-11-27T15:09:11+5:30
या पुरुषाची एक वर्षांपूर्वी ओळख झाली होती, त्यानंतर आतापर्यंत हि महिला त्याला त्रास देत असल्याचे पोलिसांकडे असलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे

एलआयसी काढायला लावली; २ लाख, सोन्याची अंगठी मागितली, त्रासाला कंटाळून तरुणाची पोलिसात धाव
पुणे : देवदर्शनावेळी झालेल्या ओळखीतून एका महिलेने तक्रारदार विवाहित व्यक्तीसोबत ओळख वाढविली. त्यानंतर त्यांना भाऊ मानत असल्याचा दिखावा करत काशी विश्वनाथ येथे नेले. त्यानंतर पुण्यात आल्यानंतर जबरदस्तीने एक सोन्याची अंगठी फिर्यादी यांना घालण्यास लावली. त्यानंतर आताच्या आता लग्न कर अन्यथा २ लाख दे, नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी प्रल्हाद वाजंळे (४२, रा. धनलक्ष्मी रेसिडेन्सी, रामकृष्ण परमहंस नगर, कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चंदगड, कोल्हापूर येथील एका ४७ वर्षीय तक्रारदाराने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोल्हापूरमधील चंदगड येथील रहिवासी आहेत.
गौरी वांजळे सोबत त्या व्यक्तीची तुळजापुर येथे मागील वर्षी दि 07/11/2024 रोजी असे देवदर्शनासाठी गेले तेव्हा ओळख झाली होती. त्यावेळी गौरी वांजळेने ओळखीचा फायदा घेऊन फिर्यादीच्या पत्नीस कॉल करुन घरी येऊन राहण्यास सुरुवात केली. घरी आल्यानंतर तिने फिर्यादीला भाऊ मानण्यास सुरुवात केली. हायकोर्टात वकीलीची प्रॅक्टीस करत असल्याचे सांगून मोठमोठ्याने ओळखी आहेत असेही सांगितले. त्या ओळखीने तुमचे जे काही काम असेल ते मी तुम्हास भाउ या नात्याने करुन देईन असे आश्वासन महिलेने दिले. दुस-या दिवशी महिलेने कलावती मंदिर बेळगाव येथे दर्शनासाठी जायच असं सांगून सोबत गेली. त्यावेळी महिलेने बेस्ट फ्रेंड असल्याचे सांगत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु फिर्यादीने तिला तातडीने झटकले. दुचाकीवरून जाताना तिने घाणेरडे बोलण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी फिर्यादीने गावी येऊ नकोस असे खडसावले. दर्शनानंतर फिर्यादीने महिलेला पुण्याला जाण्यास सांगितले.
तेव्हा महिला माफी मागून फिर्यादीच्या राहत्या घरी आली. त्यादिवशी घरी आल्यावर महिलेने पत्नीला विनंती करुन घरी दोन दिवस राहीली. दुस-या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे फिर्यादी कामावर गेल्यावर त्या महिलेने पैसे मागितले. त्याने नकार दिल्यावर त्याच्या लहान भावाकडून २००० घेतले. दुस-या दिवशी महिलेने तिचे घरी जायचे सांगून चंदगड स्टॅन्डपर्यंत सोडण्यासाठी विनंती केली. दुचाकीवरुन ते चंदगड स्टॅन्डला गेल्यावर वॉशरुमला लॉजवर जायचे असे महिलेने सांगितले. तेव्हा फिर्यादीसोबत महिला लॉजवर गेली.ती लॉजच्या रुममध्ये गेल्यानंतर फिर्यादीला रूममध्ये बोलावून महिलेने खूप मोठी वकील असल्याचे सांगितले. मी तुमची साथ देईन तुमच्या मुलाला मंत्रालयातील लोकाच्या ओळखीने नोकरीला लावेन अशी आशा दाखवून हात धरून ओढण्यास सुरुवात केली. त्यावेळी नकार देऊन तो खाली आला. त्यापाठोपाठ महिला खाली येऊन स्टँडवरून बस धरुन पुण्याला गेली. त्यानंतर साधारण 8 दिवसांनी फिर्यादीला कॉल करुन सांगितले की, मला सरकारी टॅक्स खुप भरावा लागतो. तुम्ही माझी एल आय सी करुन दया अशी विनंती केली. फिर्यादीने तिला एलआयसी पॉलिसी काढून दिली. पुढे ती घरी थांबली. त्यांनतर ती पुण्याला गेल्यांनतर तेथुन फिर्यादीच्या पत्नीला कॉल करून सांगितले की, आम्ही पुण्यातुन माझी मैत्रीण स्वाती व तिची फॅमिली असे सर्वजण काशी विश्वनाथ दर्शनासाठी जाणार आहोत. मी तुमच्या पतीला भाऊ समजुन सोबत घेऊन जाणार आहे. कारण सध्या प्रयागराज मध्ये कुंभमेळावा भरला आहे. विश्वनाथला माझ्या सोबत पाठवा त्यावेळी फिर्यादीच्या पत्नीने देवदर्शन घेवुन या असे सांगुन पुण्याला पाठवले.
दि 25/02/2025 काशी विश्वनाथला जायच असल्याने फिर्यादी पुण्यात स्वारगेट वर आला. त्यावेळी बहीण या नात्याने एक मोबाईल दिला व सांगितले की तुम्ही एकटे राहु नका माझ्या घरी चला. तेव्हा फिर्यादी गौरी वांजळेच्या कोथरुडमधील घरी राहण्यास गेलो. त्यानंतर तिने त्याचा मोबाईल काढून घेतला व सांगितले की स्वातीची सासु वारले असून त्यांचे येणे कॅन्सल झाले आहे. त्यामुळे आपण दोघेच विमानाने जायचे आहे. आपले दोघांचे विमानाचे टिकीट मी काढले आहे असे सांगितले व मला तिचे बेडरुममध्ये झोपवले. त्यावेळी फिर्यादी झोपले असता त्यांना काहीतरी प्यायला देवुन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी धमकी देऊन काशी विश्वनाथला घेऊन गेली. त्याठिकाणी शारीरिक संबंधांची जवळीक करू लागली. फिर्यादीच्या पत्नीचा कॉल आल्यावर आम्ही सर्वजण आहोत असे सांगण्यास भाग पाडले. फिर्यादी त्यावेळी घाबरत घाबरत तिच्यासोबत पुण्याला आले. त्यानंतर लग्न कर, २ लाख दे असं मी,म्हणत पैशांचा तगादा लावला. फिर्यादीकडे अंगठीही मागितली. फिर्यादी त्यावेळी तिच्या तावडीतून सूटून चंदगड येथे आले. त्यानंरही फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २ लाख मागितले.