शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या खूनप्रकरणी पाच जणांना अटक

By admin | Updated: February 16, 2015 04:35 IST

इंद्रायणीनगर, भोसरीत २१ वर्षीय तरुणावर हत्याराने वार करून व डोक्यात दगड घालून शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास खून करण्यात आला

पिंपरी : इंद्रायणीनगर, भोसरीत २१ वर्षीय तरुणावर हत्याराने वार करून व डोक्यात दगड घालून शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास खून करण्यात आला. या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी शनिवारी रात्री तर एकाला रविवारी अटक केली. रामा भीमराव गोटे (वय १९, रा. बालाजीनगर वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नागेश साहेबराव गायकवाड (वय २०), महेश ऊर्फ जॅकी मच्छिंद्र कांबळे (वय १९), ओंकार सचिन बांदल (वय २३), विकी बबन ओव्हाळ (वय २०, सर्व रा. बालाजीनगर वसाहत, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी रविवारी सकाळी इंद्रायणीनगरमध्ये आणखी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी राजेश स्वामी (वय २९, रा. दापोडी) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामा गोटे आपल्या लखनकुमार व स्वामी या साथीदारांसह इंद्राायणीनगरातील एका हॉटेलजवळ थांबले होते. त्या वेळी सहा ते सात हल्लेखोर आले. त्यांनी या तिघांवर धारदार हत्यारांनी हल्ला चढवला. हल्लेखोरांनी रामा याच्या डोक्यात दगड घातला, तर इतर दोघांवरही वार केले.गोटे याचे येथील काही तरुणांशी शुक्रवारी भांडण झाले होते. त्याने एकाला मारहाणही केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. एमआयडीसी पोलिसांनी चार हल्लेखोरांना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास मोशी येथून अटक, तर एकाला रविवारी सकाळी इंद्रायणीनगरला अटक केली. एक जण फरार आहे. (प्रतिनिधी)