शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

जवानांच्या सुरक्षेची ‘अग्नि’परीक्षा

By admin | Updated: July 19, 2014 03:23 IST

आग लागल्याचा कॉल नियंत्रण कक्षामध्ये येऊन धडकताच वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करीत घटनास्थळी पोहोचून आगीमध्ये अडकलेल्या नागरिकांचा जीव वाचवावा लागतो

दीपक जाधव, पुणेआग लागल्याचा कॉल नियंत्रण कक्षामध्ये येऊन धडकताच वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करीत घटनास्थळी पोहोचून आगीमध्ये अडकलेल्या नागरिकांचा जीव वाचवावा लागतो. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांच्या सुरक्षिततेकडे मात्र प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. निकृष्ट गणवेश, अपुरी हेल्मेट या साधनसामग्रीसह त्यांना झुंजावे लागत आहे.मुंबईतील लोटस इमारतीला लागलेल्या आगीत अग्निशामक दलाचा एक जवान शहीद झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. २२ मजली इमातरतीला लागलेली आग विझविताना धुरामध्ये श्वास कोंडला गेल्याने अग्निशामक दलाच्या जवानाला जीव गमवावा लागला. पुण्यामध्येही आगीची मोठी दुर्घटना घडल्यास पुरेशा साधनसामग्रीअभावी अग्निशामक दलाला कठोर परीक्षा द्यावी लागेल, अशी परिस्थिती आहे. शहर अग्निशामक दलामध्ये २० अधिकारी व ४०० जवान कार्यरत आहेत. त्यांना अडीच वर्षांपासून गणवेश दिला नव्हता. त्यानंतर देण्यात आलेला गणवेश अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. तसेच, हेल्मेटची संख्या अत्यंत अपुरी आहे. आगीचा कॉल मोठा असल्यास फायरगाडीसोबत रेस्क्यू व्हॅन पाठविली जाते. या व्हॅनमध्ये जंपिंग सेट, जनरेटर व इतर आवश्यक साधनसामग्री असते. शहर अग्निशामक दलाकडे केवळ दोनच रेस्क्यू व्हॅन आहेत, त्यांची अवस्थाही बिकट आहे. शहरातील इमारतींचे आॅडिट करून त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानांच्या सुरक्षेचे आॅडिट करण्याची गरज आहे. एखादी दुर्घटना घडून गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याची भावना दलातील जवानांनी व्यक्त केली.