शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी - मरकळ रस्त्यावरील धानोरे येथील वैशाली असेमेंट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 12:27 IST

अग्निशमन दलाला दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले

आळंदी : आळंदी - मरकळ रस्त्यावरील धानोरे फाटा (ता.खेड) येथील वैशाली असेमेंट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आज (दि.१७) पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. सुदैवाने सदर आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. परंतु कंपनीतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान आळंदी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आगीची व्याप्ती वाढत असल्याने पीएमआरडीए व पीसीएमसी अग्निशमन दलांना देखील घटनास्थळी पाचारण करून दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.            धानोरे फाटा परिसरात आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यापूर्वीही या परिसरात असलेल्या औद्योगिक कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान बुधवारी पहाटे येथील वैशाली असेमेंट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आग लागली. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिस व मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र कंपनीमध्ये आगी दरम्यान स्फोट होत असल्याने आग मोठ्या प्रमाणावर इतरत्र पसरत होती. परिणामी अग्निशमन दलांकडून फोम मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाची मदत मागवण्यात आली. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझविण्यात यश आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीसुद्धा घटनास्थळी कंपनीमध्ये रासायनिक केमिकल मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. त्यामुळे हा स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान आगीच्या वाढत्या घटनांचा स्थानिक नागरिकांनी धसका घेतला आहे.             सदरची आग विझविण्यात आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाच्या विनायक सोळंकी, प्रसाद बोराटे, पदमाकर श्रीरामे, अक्षय त्रिभुवन, तुळशीराम कोळपे या कर्मचाऱ्यांसह पीएमआरडीए व पीसीएमसी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. घटनास्थळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके व आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीfireआगWaterपाणीbusinessव्यवसायFire Brigadeअग्निशमन दल