शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूचा शहराला विळखा

By admin | Updated: February 4, 2015 00:18 IST

शहरात स्वाइन फ्लूची तीव्रता झपाट्याने वाढू लागल्याने पुन्हा २००९ सारखी गंभीर स्थिती उद्भविण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पुणे : शहरात स्वाइन फ्लूची तीव्रता झपाट्याने वाढू लागल्याने पुन्हा २००९ सारखी गंभीर स्थिती उद्भविण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरात शहरात स्वाइन फ्लूचे जेवढे रुग्ण सापडले होते तेवढे या वर्षी अवघ्या ३४ दिवसांमध्ये सापडले आहेत. २०१३ मध्ये स्वाइन फ्लूचे ३५ रुग्ण सापडले होते. या नव्या वर्षात दि. १ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल ३७ नवे रुग्ण सापडले आहेत. यावरून स्वाइन फ्लूचा पुण्याला पुन्हा विळखा बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आज दिवसभरात स्वाइन फ्लूचे नवे ८ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून गायब असलेल्या स्वाइन फ्लूने शहरात थंडी पडताच डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. जानेवारी महिन्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येऊ लागले. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या महिन्यात स्वाइन फ्लूने ७ जणांचा बळीही घेतला. यात भर म्हणून आज शहरात आणखी ८ नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांमुळे रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या १५ झाली असून, यापैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. या नव्या रुग्णांमुळे या वर्षातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३७ वर पोहोचली आहे. स्वाइन फ्लूची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले असून, सर्दी-खोकला, घसादुखी होताच स्वाइन फ्लूची तपासणी करण्यासाठी नागरिक दवाखाने, रुग्णालयांमध्ये गर्दी करू लागले आहेत. तपासणीसाठीचे हे प्रमाण महिनाभरात दुप्पट झाले आहे. आज दिवसभरात तब्बल ९५२ जणांनी स्वाइन फ्लूची तपासणी केली. यापैकी ११० जण संशयित आढळून आले असून, त्यांना टॅमी फ्लू औषधे देण्यात आली आहेत. यापैकी १६ जणांच्या घशातील कफांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)