धक्कादायक! वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मीटररुममध्ये कोंडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:39 IST2021-03-17T15:39:00+5:302021-03-17T15:39:50+5:30
सलीम सय्यद यांचे ११ हजार ४८१ रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने फिर्यादी यांना दिलेल्या कामानुसार त्यांनी विद्युत पुरवठा खंडीत केला.

धक्कादायक! वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मीटररुममध्ये कोंडले
पुणे : वीज बिल थकल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्यामहिला कर्मचार्याला मीटर रुममध्ये कोंडण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
सलीम बशीर सय्यद (वय ४१, रा. सुखनिवास, एस आर ए बिल्डिंग, मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी माधुरी सुनिल कुलसंगे (वय २८, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
सलीम सय्यद यांचे ११ हजार ४८१ रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने फिर्यादी यांना दिलेल्या कामानुसार त्यांनी विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यावर आरोपी चिडून मीटर रुमच्या दरवाज्यासमोरुन फिर्यादींच्या अंगावर धावत आला. आमची कट केलेली लाईट चालू कर, नाही तर मी तुला येथेच रुममध्ये कोंडून ठेवेन, असे धमकावले. त्या समजावून सांगत असताना मीटर रुमची बाहेरुन कडी लावून फिर्यादी यांना आत कोंडून ठेवले. त्यानंतर फिर्यादी यांनी कार्यालयातील ऑफिस असिस्टंट शैलेश धुमाळ यांना फोन करुन बोलावून घेतले. धुमाळ यांनी त्यांची सुटका केली. सय्यद याने त्यांनाही शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा आणला.