एमआयटी शिक्षण संस्थेतील महिला कर्मचारीचा विजेच्या झटक्याने मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 17:38 IST2025-05-20T17:36:28+5:302025-05-20T17:38:47+5:30

लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू असून या दुर्घटनेने हॉस्टेलमधील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे

Female employee of MIT educational institute dies of electric shock Incident in Loni Kalbhor | एमआयटी शिक्षण संस्थेतील महिला कर्मचारीचा विजेच्या झटक्याने मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

एमआयटी शिक्षण संस्थेतील महिला कर्मचारीचा विजेच्या झटक्याने मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

लोणी काळभोर : लोणी काळभोर येथे एका ३४ वर्षीय महिलेचा विजेच्या झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. शामल संतोष आगाव (वय ३४, रा. गोपाळपट्टी, मांजरी, ता. हवेली मूळ, रा. बीड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, शामल आगाव या लोणी काळभोर येथील एमआयटी शिक्षण संस्थेतील मुलींच्या वसतिगृहात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी (दि. १९) सकाळी त्या नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाल्या. काही वेळानंतर त्या टेरेसवर असलेल्या सोलर व पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यासाठी गेल्या. त्यावेळी सोलर व पाण्याच्या टाकीजवळ वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहात विजेचा प्रवाह उतरला होता. त्यांनी तातडीने वरिष्ठांना कळवले आणि शामल यांना विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शामल यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेने हॉस्टेलमधील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Web Title: Female employee of MIT educational institute dies of electric shock Incident in Loni Kalbhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.