शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

मुलांसमोरच वडिलांचा खून

By admin | Updated: August 21, 2015 02:39 IST

चाळिशीतील तरुणाचा त्याच्या मुलांसमोरच लाकडी फळी आणि स्टंपने डोक्यात घाव घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

राजगुरुनगर : चाळिशीतील तरुणाचा त्याच्या मुलांसमोरच लाकडी फळी आणि स्टंपने डोक्यात घाव घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.आनंद सुदाम काशीद (वय ४०, रा. गायत्री अपार्टमेंट, सदनिका क्र. ७, ब्राह्मणआळी, राजगुरुनगर) असे या घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तो विटा, वाळू पुरविण्याचा आणि चायनिज खाद्यपदार्थांची गाडी चालविण्याचा व्यवसाय करीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद काशीद यांचा मुलगा मनीष ( वय १४) याने याबाबत फिर्याद दिली आहे. काशीद यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेच्या मुलीचा वाढदिवस बुधवारी होता. त्यासाठी काशीद आणि त्यांचा मुलगा मनीष व मुलगी श्वेता आपल्या राहत्या घरातून निघाले होते. ते तिघे जिन्यावरून उतरत असताना त्यांच्याच इमारतीत राहणारा अविनाश ऊर्फ दाद्या अशोक तळेकर, माऊली बाजारे (रा. कुंभारवाडा, राजगुरुनगर) आणि गणेश (पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांनी आनंद काशीद यांना अडविले आणि गचांडी पकडून शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर लगेच अविनाश तळेकर याने त्याच्या हातातल्या लाकडी फळीने आनंदच्या डोक्यात फटके मारले. दुसऱ्या दोघांनी हातातल्या स्टंपने मारहाण केली. मुलगी श्वेता हिने आरडओरड केल्याने शेजारीपाजारी जमा झाले. तरीही त्याला कोणी वाचवू शकले नाही. मारहाणीमुळे गंभीर दुखापत झाल्याने आनंद जिन्यावरच गतप्राण झाले.पोलिसांनी तिन्ही आरोपींवर भा.दं.वि. कलम ३०२ आणि ३४ द्वारे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खुनाचे कारण समजू शकले नाही. सहायक फौजदार ए. टी. शिंदे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)