दाट धुक्याने पुणे - नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 10:35 IST2023-12-01T10:34:18+5:302023-12-01T10:35:09+5:30

पहाटे पाचच्या सुमारास दाट धोक्यामुळे पुढील अंदाज न आल्यामुळे क्रुझरची जोरदार धडक

Fatal accident on Pune Nashik highway due to dense fog Three dead three seriously injured | दाट धुक्याने पुणे - नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

दाट धुक्याने पुणे - नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

अवसरी : मंचर पुणे नाशिक महामार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात तीन ठार तीन गंभीर तर दोन किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सायखेडा ता. सटाणा येथुन पुण्याकडे चाललेल्या क्रुझर वाहनाने आज पहाटे पाच च्या सुमारास दाट धोक्यामुळे पुढील अंदाज न आल्यामुळे पाठीमागून जोरदार धडक दिल्याने  चालक पंकज खंडु जगताप (वय ३६),मधुकर तुकाराम अहिरे (वय ५२), शांताराम संभाजी अहिरे (सर्व रा. जायखेडा ता. सटाणा) हे तीन जण ठार तर तीन गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत, त्यांना मंचर ऊपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले असून  पोलिस हवालदार राजेंद्र हिले व पोलीस कॉन्स्टेबल मोमीन घटनास्थळी धाव घेऊन इतर वाहनांना रस्ता मोकळा करून दिला आहे.

Web Title: Fatal accident on Pune Nashik highway due to dense fog Three dead three seriously injured