शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शतावरी, अश्वगंधा लागवड करण्यास सांगून शेतकऱ्यांसह गुंतवणुकदारांची तब्बल '२३ कोटींची' फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 13:53 IST

शुन्य हर्बल अग्रो डेव्हलपमेट प्रा. लि.च्या ऋषिकेश पाटणकरला अटक

ठळक मुद्देशेतकऱ्यांना ५० हजार जमा करण्यास सांगून कंपनीनं दिली विविध आश्वासनं

पुणे : शतावरी आणि अश्वगंधा य औषधी वनस्पतींची शेतात लागवड करुन येणारं पिक एकरी ३ लाख रुपये मोबदला देऊन विकत घेण्याचे आश्वासनं दिलं.  तसेच गुंतवणुकदारांना आयुष मंत्रालयाचा संदर्भ देऊन गुंतवणुक करण्यास भाग पाडून २३ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेतील आर्थिक गुन्हे शाखेनं एकाला अटक केली आहे.

ऋषिकेश लक्ष्मण पाटणकर (वय ३८, रा. आकाशदीप सोसायटी, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल शहा (वय ४६, रा. जयराज किरण सोसायटी, वाळवेकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पाटणकर यानं तीन वर्षांपूर्वी शुन्य हर्बल अग्रो डेव्हलपमेट प्रा. लि. या  कंपनीची स्थापना केली. त्यानं असंख्य शेतकरी आणि गुंतवणुकदार यांना शतावरी आणि अश्वगंधा या औषधी वनस्पतीची त्यांचे शेतात लागवड करावी, असं सांगितलं. येणारं पिक स्वत: विकत घेऊन त्यांना दरवर्षी एकरी ३ लाख रुपये मोबदला देण्याचं आमिष दाखवलं.  तसेच त्यासाठी एकेरी ५० हजार रुपये कंपनीकडे जमा करायचे.

कंपनी शेतकर्‍यांना रोपं देणारं, त्यांची लागण ते स्वत: करणार, सुपर व्हिजन करणार, खते देणार, एक वर्षांनी कंपनी स्वत: काढणी व वाहतूक करुन शेतकर्‍यांना जागेवर पैसे देणार अशी भरघोस आश्वासनं दिली. त्यानुसार सोलापूर सह अनेक जिल्ह्यातील असंख्य शेतकर्‍यांनी आपल्या शेतात कंपनीकडून रोपं घेऊन लागवड केली. त्यानंतर १८ महिन्यांनी त्यांनी मालही काढून नेला. परंतु, शेतकर्‍यांना पैसे मात्र दिले नाही. गेले दीड -दोन वर्षे शेतकरी पुण्यात अरण्येश्वर येथील कंपनीच्या कार्यालयात पैशांसाठी हेलपाटे मारत होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचीही शेतकर्‍यांनी भेट घेतली.

तरीही काही उपयोग न झाल्याने शेवटी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना भेटून शेतकर्‍यांनी आपली हकीकत सांगितली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास करुन ऋषिकेश पाटणकर याला अटक केली आहे. त्याने अशा प्रकारे असंख्य शेतकरी आणि गुंतवणुकदार यांची सुमारे २३ कोटी ४५ लाख १ हजार ९९४ रुपयांची फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेने ऋषिकेश पाटणकर याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सहाणे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीfraudधोकेबाजीMONEYपैसाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक