शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुंना फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 22:48 IST

फसवणूक प्रकरणात पुण्यातून ताब्यात घेऊन सायंकाळी पथक मुंबईला रवाना

पुणे : मुंबईपोलिसांनी पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुंना पुण्यातून गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेऊन मुंबईला नेण्यात आले आहे. 

श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे (वय ६३), शशांक पुरुषोत्तम परांजपे (वय ५९) अशी या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहे. याप्रकरणी वसुंधरा डोंगरे यांनी विर्लेपार्ले पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांनुसार ४७६, ४६७, ४६८, ४२० व १२० (ब) या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी या परांजपे यांच्या कुटुंबियांशी संबंधित आहेत. परांजपे यांच्या काही जागा या मुंबईतील विलेपार्ले परिसरात आहेत. ती जागा विकण्यात आली आहे. फिर्यादी या वारस असताना त्यांना काहीही न सांगता त्यांना कळू न देता ही जागा विकण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. बनावट दस्त बनवून तसेच विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तातडीने पुण्यात आले. परांजपे बंधुंना सायंकाळी डेक्कन परिसरातील राहत्या घरातून ताब्यात घेतले. डेक्कन पोलिसांना याबाबत माहिती देऊन हे पथक मुंबईला रवाना झाले. लागोपाठ दोन बांधकाम व्यावसायिकांना फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आल्याने पुण्यातील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकbusinessव्यवसायfraudधोकेबाजीMumbaiमुंबईPoliceपोलिस