शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
2
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
3
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
4
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
5
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
6
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
7
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
8
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
9
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
10
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
11
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
12
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
13
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
14
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
15
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
16
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
17
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
18
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
19
Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!
20
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
Daily Top 2Weekly Top 5

Pooja Chavan Suicide Case : आत्महत्या केलेल्या तरुणीच्या लॅपटॉप व मोबाईलमध्ये खळबळजनक माहिती; चंद्रकांत पाटलांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 20:22 IST

Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु...

पुणे : पुण्यामध्ये रविवारी एका २२ वर्षीय तरुण मुलीनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्याचा थेट संबंध असल्याचा आरोप आता होतो आहे. मंत्र्याशी संबंधित आत्महत्या प्रकरणातल्या तरुणीच्या लॅपटॉपमध्ये अत्यंत खळबळजनक माहिती असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'लोकमत'शी केला आहे. 

पुण्यातील महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने रविवारी मध्यरात्री तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. मात्र पूजेच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. राज्य सरकारमधील 'त्या' कथित मंत्र्यासोबतच्या प्रेमसंबंधात निर्माण झालेल्या तणावातूनच या तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने उचलून धरली आहे. आत्महत्या केलेल्या मुलीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी मंत्र्याचे नाव घेण्याचे टाळतानाच आत्महत्या केलेल्या तरुणीच्या लॅपटॉप व मोबाईल मध्ये असलेली माहिती पोलिसांनी जाहीर करावी. अन्यथा दोन तीन दिवसांमध्ये ती लोकांसमोर येईलच असे म्हणाले आहे. हे संपूर्ण प्रकरण भयानक असून यासंबंधी पोलिसांनीच ही माहिती जाहीर करावी अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.

यावेळी धनंजय मुंडे यांचे प्रकरण देखील दाबले गेले असल्याचा दावा करताना तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातली माहिती मात्र बाहेर येईलच असे स्पष्टपणे सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणात पवारांकडून आपली अपेक्षा असल्याचंही म्हणत पवार गप्प का असा सवालही त्यानी उपस्थित केला आहे.  “ रेणु आणि करुणा शर्मा प्रकरणात थेट तक्रार आणि कबुली दिल्यावरही पुढे काही त्याचे झाले नाही. त्याबरोबरच आता या प्रकरणातही काही होत नाही. पवार नेकीने वागणारे नेते आहेत. ते गप्प का? त्यांच्याकडुन आमची अपेक्षा आहे “ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

या सरकार मधल्या अनेक मंत्र्याच्या बाबतीत वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या बाबतीत केसेस आहेत. याबरोबरच हे सरकार थेट जनतेमधुन निवडुन आलेले आहे ते जनतेला उत्तरदायी नसल्याचाही आरोप पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसchandrakant patilचंद्रकांत पाटीलState Governmentराज्य सरकारSharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेPooja Chavanपूजा चव्हाण