हडपसर भागात दहशत माजवणाऱ्या गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:34 IST2025-10-13T15:34:18+5:302025-10-13T15:34:34+5:30

गुंड टिपू पठाण अणि साथीदारांनी एका महिलेची जमीन बळकावून बेकायदा ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

Extortion case registered against gangster Tipu Pathan and his associates who created terror in Hadapsar area | हडपसर भागात दहशत माजवणाऱ्या गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा

हडपसर भागात दहशत माजवणाऱ्या गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा

पुणे : हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत माजवणारा गुंड टिपू पठाण अणि साथीदारांनी एका महिलेची जमीन बळकावून बेकायदा ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पठाण आणि साथीदारांनी जमिनीवरील ताबा सोडण्यासाठी महिलेकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली असून, या प्रकरणी पठाणसह साथीदारांविरोधात काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका ३१ वर्षीय महिलेने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळची मुंबईतील कुर्ला परिसरातील रहिवासी आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, टिपू उर्फ रिझवान सत्तार पठाण, सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब अब्दुल गफार शेख, जावेद गणी शेख, साजीद जिब्राईल नदाफ, इराफान नासीर शेख, अजीम उर्फ अंट्या महंमद हुसेन शेख, मतीन हकीम सय्यद (सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची सय्यदनगर भागात जमीन आहे. गुंड टिपू पठाण आणि साथीदारांनी महिलेच्या जागेवर बेकायदा पत्र्याचे शेड बांधले. या जागेचा ताबा घेऊन ते एकाला भाड्याने वापरासाठी दिले. पठाण आणि साथीदार त्याच्याकडून दरमहा जागेचे भाडे घेत होते. महिलेने पठाण टोळीला जागेवरचा ताबा सोडण्यास सांगितले. तेव्हा पठाणने महिलेकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिल्यानंतर जागेवरचा ताबा सोडतो. पुन्हा या भागात आला तर जीवे मारु, अशी धमकी पठाणने दिल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील पुढील तपास करत आहेत.

पठाण याच्यासह साथीदारांची बँक खाती नुकतीच गोठवण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी पठणसह साथीदारांची घराची झडती घेतली. तेथून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, महागडी कार, तीन दुचाकी, तसेच गृहोपयोगी वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पठाणने केलेल्या बेकायदा बांधकामावर काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईत पठाण याचे कार्यालय, तसेच बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यात आले हाेते. या कारवाईनंतर पोलिसांनी पठाण याच्यासह दहा साथीदारांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्या घरातून पंखे, टीव्ही, वॉशिंग मशिन, महागडे फर्निचर असा चार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title : पुणे: हडपसर में कुख्यात गुंडे टीपू पठान पर वसूली का मामला दर्ज

Web Summary : टीपू पठान और उसके गिरोह पर पुणे के हडपसर में एक महिला की जमीन हड़पने और वापसी के लिए ₹25 लाख मांगने का आरोप है। पुलिस ने महिला की शिकायत पर पठान और उसके साथियों के खिलाफ वसूली का मामला दर्ज किया है। जांच जारी है, जिसमें पहले संपत्ति जब्ती और पठान से जुड़े अवैध निर्माण को ध्वस्त करना शामिल है।

Web Title : Pune: Notorious Goon Tipu Pathan Booked for Extortion in Hadapsar

Web Summary : Tipu Pathan and his gang allegedly seized a woman's land in Hadapsar, Pune, demanding ₹25 lakh for its return. Police have filed an extortion case against Pathan and his accomplices following the woman's complaint. Investigations are underway, with previous actions including property seizures and demolition of illegal constructions linked to Pathan.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.