शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

सोमेश्वर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार

By admin | Updated: March 29, 2017 00:05 IST

येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचा मध्य विभागातील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम

सोमेश्वरनगर : येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचा मध्य विभागातील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच मांजरी या ठिकाणी प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम आदींच्या हस्ते हा पुरस्कार सोमेश्वर कारखान्याला प्रदान करण्यात आला.साखर उतारा, टनाला वाढलेले उत्पादन, साखर उत्पादन खर्च, नेटवर्थ या सर्वच निकषामध्ये सोमेश्वर कारखाना पात्र ठरल्याने कारखान्यास उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, उपाध्यक्ष सिद्धार्थ गिते, कार्यकारी संचालक सुरेश तावरे, फायनान्स मॅनेजर बाळासाहेब कदम, संचालक सुनिल भगत, नामदेवराव शिंगटे, विशाल गायकवाड, लालासाहेब माळशिकारे, किशोर भोसले, दिलीप थोपटे, ऋतुजा धुमाळ, शैलेश रासकर, महेश राणे, दिलीप थोपटे कामगार कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व अधिकारी वर्गाने पुरस्कार स्वीकारला.कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप म्हणाले, सर्व सभासदांच्या सहकार्यामुळे तसेच कारखान्याचे अधिकारी, कामगार, ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार यांच्या प्रामाणिक कामातून कारखान्यास उत्कृष्ट अर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार मिळाला आहे. (वार्ताहर)नवले उत्कृष्ट कार्यकारी संचालकबावडा : इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.बी. नवले यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट कार्यकारी संचालक’ हा पुरस्कार सोमवारी मांजरी बु. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे हस्ते सपत्निक स्वीकारला. नवले हे सहकारी साखर कारखानदारीमध्ये सुमारे ३९ वर्षांपासून काम करीत आहेत. नीरा भीमा साखर कारखान्यास केंद्र व राज्य पातळीवरील उत्कृष्ट कामगिरीची एकूण १० विविध पारितोषिकेही नवले हे कार्यकारी संचालक असताना प्राप्त झालेली आहेत.