घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 12:05 IST2025-05-22T12:04:22+5:302025-05-22T12:05:30+5:30

मुलीने पळून जाऊन लग्न केलं तर समाजात बदनामी होईल असा विचार करून आम्ही कुटुंबीयांनी लग्न लावून दिलं होतं

Everyone in the house was against it Vaishnavi hagwane was still insistent on a love marriage, her uncle told her the whole story. | घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..

घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..

किरण शिंदे 

पुणे:५१ तोळे सोनं, आलिशान फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि धुमधडाक्यात लग्न लावून दिल्यानंतरही वैष्णवी हगवणेचा सासरी छळ सुरू होता. सासरा, सासू, पती, दीर, नणंद सगळेच वैष्णवीचा छळ करायचे. इतकंच नाही तर तिला मारहाणही करायचे. अर्थात हे सर्व वैष्णवीच्या व्हॉट्सॲप चॅटिंगमधून समोर आलंय. वैष्णवीने मैत्रिणी सोबत केलेल्या चॅटिंगमध्ये या सगळ्यांचा उल्लेख केलाय. त्यामुळे हगवणे फॅमिली किती क्रूर होती. हे आता सर्वांच्या समोर आलंय. मात्र वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी याहून धक्कादायक खुलासे केले आहेत. 

हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीला हिप्नोटाइज केलं होतं की काय असा संशयही त्यांना आहे. कारण वडील आयसीयूत असताना वैष्णवी शशांक हगवणेसोबत पळून जायला निघाली होती. मात्र त्यानंतर मामा उत्तम बहिरट यांनी मध्यस्थी केली आणि वैष्णवी हगवणे कुटुंबीयांची सून म्हणून गेली. वैष्णवीच्या आई-वडिलांचा मात्र सुरुवातीपासूनच या प्रेमविवाहाला विरोध होता. मात्र मुलीने पळून जाऊन लग्न केलं तर समाजात बदनामी होईल असा विचार करून आम्ही कुटुंबीयांनी लग्न लावून दिलं होतं. मात्र लग्नानंतर काही दिवसातच वैष्णवीला छळाला सामोरे जावे लागले. 

वैष्णवी अन् शशांकच लग्न कसं जुळलं याबद्दल मामा उत्तम बहिरट सांगितले की, हे लव्ह मॅरेज आहे. त्याला सगळ्यांचा विरोध होता. घरातील सगळ्यांचा विरोध असूनही वैष्णवीने माझ्याकडे लग्न करण्यासाठी हट्ट धरला होता. तिला त्याच्याशीच लग्न करायचं होत. त्यांच्या घरात यावरुन वाद झाले. त्यावेळी वैष्णवीचे वडील आनंद ऍडमिट होते. शशांक तिच्या घरी इथं आला. आणि आपण पळून जाऊन लग्न करू असं म्हणत तिला चल म्हणाला. त्यावेळी तिने माझ्या मुलाला पळून लग्न करणार असल्याचे सांगितले. माझ्य मुलाने असं काय निर्णय घेऊ नको. वडील आयसीयू मध्ये आहेत असे सांगून तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्याने लगेच मला फोन करून सांगितलं. आम्ही धावतपळत घरी आलो. तिला समजावून सांगितलं. तसेहच शशांकला फोन करून सांगितलं कि आपण निर्णय नंतर घेऊ. त्यानंतर आपली समाजात बदनामी होऊ नये. म्हणून लग्न लावून दिल. त्यानंतर हुंडा मागण्यास सुरुवात केली. त्याने फॉर्च्युनर मागितली ती दिली होती. त्यानंतर एक लाखांचं घड्याळाची दिलं. त्यावेळी मी वैष्णवीला हे काय चाललंय याबाबत विचारलं होतं. माझ्याकडून चूक झाल्याचे तिने मला सांगितलं होतं. अजित दादांना माझी विनंती आहे, की मुलीला न्याय द्या, तिला हगवणे कुटुंबाने अमानुष मारहाण केली आहे. हगवणे कुटुंबाला शिक्षा व्हायला हवी अशी आमची मागणी आहे   

दरम्यान 16 मे या दिवशी वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचललं. आज वैष्णवी आपल्यात नाहीये. तिच्या सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिघांना अटकही करण्यात आली. मात्र या घटनेतील प्रमुख आरोपी म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं तो राजेंद्र हगवणे अर्थात तिचा सासरा अद्यापही फरार आहे. राजेंद्र हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. मुळशीतील मोठं प्रस्थ आहे. त्यामुळे त्याच्यावर राजकीय वरदहस्त तर नाही ना,  असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय. खर तर वैष्णवी आणि शशांच्या लग्नाला अजित पवारही उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते हुंड्यात दिलेल्या फॉर्च्युनरची चावी नवऱ्या मुलाला देण्यात आली होती. त्यामुळे आता अजित पवारांनी पढाकार घेऊन वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वैष्णवी च मामा उत्तम बहिरट यांनी केली आहे.

Web Title: Everyone in the house was against it Vaishnavi hagwane was still insistent on a love marriage, her uncle told her the whole story.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.