पालकमंत्री नसतानाही 'त्या' जिल्ह्यांची कामे सुरळीत; भुजबळ, गोगावलेंना अजितदादांचा अप्रत्यक्ष टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:56 IST2025-08-23T11:54:21+5:302025-08-23T11:56:52+5:30

कुणाचे सात आमदार आहेत, कोणाचे पाच तर कुणाचा एक आमदार आहे. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री नसतानाही तेथे कोणतीही अडचण आलेली नाही

Even without a guardian minister, the work of 'those' districts is going smoothly; Ajit's indirect attack on Bhujbal, Gogawale | पालकमंत्री नसतानाही 'त्या' जिल्ह्यांची कामे सुरळीत; भुजबळ, गोगावलेंना अजितदादांचा अप्रत्यक्ष टोला

पालकमंत्री नसतानाही 'त्या' जिल्ह्यांची कामे सुरळीत; भुजबळ, गोगावलेंना अजितदादांचा अप्रत्यक्ष टोला

पुणे : नाशिकरायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून काही मान्यवर आमचे इतके आमदार आहेत, असा दावा करतात. मात्र, कोणालाही काही विचारण्याची गरज नाही. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. पालकमंत्री नसतानाही या जिल्ह्यांची कामे सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे यापुढे पत्रकारांनी हा प्रश्न विचारू नये, असे सांगत स्वपक्षीय मंत्री छगन भुजबळ यांनाही अप्रत्यक्ष टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

विधानभवनात झालेल्या प्रशासकीय आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नाशिकरायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिंदेसेना व राष्ट्रवादीत वाद उफाळला आहे. गोगावले यांनी या पालकमंत्री पदावर शिंदेचा दावा असल्याचे सांगितले आहे, तर दुसरीकडे भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिल्यानंतर आता त्यांनीही नाशिकच्या पालकमंत्री पदावर अप्रत्यक्षपणे दावा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. रायगडमध्ये केवळ एक आमदार असताना राष्ट्रवादीला पालकमंत्री पद मिळाले होते. त्याच पद्धतीने नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार असल्याने पालकमंत्री पद राष्ट्रवादीलाच मिळावे, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले होते. याबाबत अजित पवार यांना विचारले असता दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर अनेक मान्यवर आपले मत व्यक्त करत आहेत. त्यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र, पालकमंत्री नेमण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. कुणाचे सात आमदार आहेत, कोणाचे पाच तर कुणाचा एक आमदार आहे. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री नसतानाही तेथे कोणतीही अडचण आलेली नाही. तेथील कामे सुरळीत सुरू आहेत. याबाबत कोणालाही काहीही विचारण्याची आवश्यकता नाही. पहिल्यापासून हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या स्वरूपाचे प्रश्न पत्रकारांनी आता यापुढे विचारू नयेत, असे सांगत पवार यांनी छगन भुजबळ यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला.

Web Title: Even without a guardian minister, the work of 'those' districts is going smoothly; Ajit's indirect attack on Bhujbal, Gogawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.