शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातही वारकऱ्यांनी जपली पायी वारीची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST

केडगाव : साधुसंत मायबाप तिही केले कृपादान । पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान॥ या उक्तीप्रमाणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग ...

केडगाव :

साधुसंत मायबाप तिही केले कृपादान ।

पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान॥

या उक्तीप्रमाणे,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाने आषाढी वारी रद्द केली असली, तरी चौघे जण वारकरी देहू ते पंढरपूर पायीवारीसाठी निघाले आहेत.

मूळचे तुळजापूर येथील असणारे हे वारकरी दर वर्षी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये देहू ते पंढरपूर पायी प्रवास करत आहेत. यावर्षी पंढरपूरला शक्य असेल इतक्या लांब त्यांचा जाण्याचा मानस आहे. पालखी सोहळ्यामध्ये ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम असतो, त्या ठिकाणी वारकरी मुक्काम करतात व दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे पायी अंतर कापत आहेत.रस्त्यामध्ये ग्रामस्थांच्या वतीने त्यांना अन्नदान, पाणी, नाष्ता, अंघोळ यांच्या सुविधा मिळत आहेत. यामध्ये शिवाजी साखरे व मीरा साखरे हे दांपत्य विलास देवकर, तसेच दगडू रोकडे या चौघांचा समावेश आहे. यामध्ये मीरा साखरे यांच्या डोक्‍यावर तुळशी, दगडू रोकडे यांच्या हाताममध्ये वीणा, तर दोघांच्या हातामध्ये भगवी पताका आहे. ज्ञानोबा-माऊलींच्या जयघोषामध्ये हे चौघे जण पंढरपूर मार्ग होत आहेत. सर्व वारकरी मूळचे तुळजापूर येथील असून येथे दाखल झाले व गुरुवार, दिनांक १ पासून देहू-पंढरपूर मार्गस्थ झाले आहेत. यासंदर्भात मीरा साखरे म्हणाल्या की, गेल्या २३ वर्षांपासून आमच्या दाम्पत्याची आषाढी वारीची परंपरा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी रद्द होऊनही पंढरीला जाण्याचा विचार आहे. आषाढी एकादशीला कळसाचे दर्शन घेण्याचा विचाराने विठुरायाच्या मनामध्ये असेल तर नक्कीच कळसाचे दर्शन मिळेल.

सहजपूर, तालुका दौंड, जिल्हा पुणे-सोलापूर महामार्गावर पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेले वारकरी.