सौरऊर्जा आयोगाची स्थापना व्हावी

By Admin | Updated: June 6, 2015 00:53 IST2015-06-06T00:53:00+5:302015-06-06T00:53:00+5:30

पर्यावरण रक्षणासाठी चौकटीबाहेरच्या कल्पना राबविण्याची गरज आहे. नव्या तांत्रिक शोधांमधून अशक्य ते शक्य करता येईल,

To establish solar power commission | सौरऊर्जा आयोगाची स्थापना व्हावी

सौरऊर्जा आयोगाची स्थापना व्हावी

पुणे : पर्यावरण रक्षणासाठी चौकटीबाहेरच्या कल्पना राबविण्याची गरज आहे. नव्या तांत्रिक शोधांमधून अशक्य ते शक्य करता येईल, असे सांगतानाच इनोव्हेशन सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी, जगाला होणाऱ्या सौरऊर्जा पॅनेल्सच्या पुरवठ्यापैकी चीनमधून एक तृतीयांश पुरवठा केला जात असून, भारतातही ऊर्जा आयोगाप्रमाणेच सौरऊर्जा आयोगाची स्थापना करून या ऊर्जेचा वापर वाढविला जावा, अशी अपेक्षा आज येथे व्यक्त केली.
प्रख्यात उद्योगपती, माजी खासदार अरुण फिरोदिया यांनी लिहिलेल्या ‘ग्रीन ग्रोथ’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. आदर्श हरित शहराविषयी कल्पना मांंडणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री गिरीश बापट, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व जनवाणीचे अध्यक्ष डॉ. विजय केळकर, महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनू आगा, वंदना चव्हाण यांच्या हस्ते मराठा चेंबरच्या सभागृहात झाले.
पुणे शहराचा एक मॉडेल सिटी म्हणून विचार करीत शहरांचे कार्बन फुट प्रिंट कसे कमी करता येईल, याचा अभ्यासपूर्वक विचार या पुस्तकात मांडला आहे, असे माशेलकर म्हणाले. वंदना चव्हाण, दत्तात्रय धनकवडे यांनीही मनोगत व्यक्त केले. खासदार प्रकाश जावडेकर यांनी द्रृकश्राव्य माध्यमाद्वारे कार्यक्रमात संवाद साधला. (प्रतिनिधी)

Web Title: To establish solar power commission