शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या तारांना ‘टेकू’

By admin | Updated: January 23, 2017 02:40 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वीज वितरणसाठी असणाऱ्या तारांची खेड तालुक्यात दुरवस्था झाली आहे. हात लागेल अशा

आंबेठाण : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वीज वितरणसाठी असणाऱ्या तारांची खेड तालुक्यात दुरवस्था झाली आहे. हात लागेल अशा अंतरावर या तारा लोंबकळत असल्याने दुर्घटना घडू नयेत, म्हणून नागरिकांनाच ठिकठिकाणी स्वत:हून लाकडाचा टेकू द्यावा लागत आहे. वीज वितरणला वारंवार कल्पना देऊनही त्यांच्याकडून याबाबत कार्यवाही होत नसल्याने सर्वसामान्य आणि प्रशिक्षण नसणाऱ्या नागरिकांनाच असे काम करावे लागत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.वीज वितरण करणाऱ्या तारांना झोळ पडल्याने त्या अगदी हात पोहोचेल अशा अंतरावर आल्या आहेत. अनेक वेळा वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे याबाबत वारंवार तक्रार करूनदेखील त्यांच्याकडून या गंभीर बाबीची दखल घेतली जात नाही. यामुळे सुरक्षा म्हणून नागरिकच या लोंबकळणाऱ्या तारांना संबंधित प्रशासन दखल घेत नाही, म्हणून स्थानिक पातळीवर अनेक वेळा नागरिकच सुरक्षेचा उपाय म्हणून या तारांना लाकडी टेकू लावत आहे. अनेक वेळा अनुभव नसताना किंवा सुरक्षेची साधने उपलब्ध नसताना जीव धोक्यात घालून असे करणे भाग पडत आहे. नागरिकांच्या वतीने अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना लोंबकळत असणाऱ्या तारा ओढून पुन्हा ताठ किंवा पूर्ववत कराव्या, असे साकडे घातले असता त्यांच्याकडून कार्यवाही केली जात नाही, म्हणून अनेक वेळा स्थानिक नागरिकांनाच त्यासाठी पुढाकार घ्यावा लागत आहे आणि उंच लाकडे वापरून त्या तारांना टेकू द्यावा लागत आहे. (वार्ताहर)