सोलापूर-पुणे रस्त्यावर जीप-ट्रकच्या अपघातात आठ वर्षांचा चिमुरडा ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 20:26 IST2019-04-29T20:25:42+5:302019-04-29T20:26:37+5:30
लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी नवदांपत्य तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले असता पृथ्वी ही त्यांच्या बरोबर गेला होता

सोलापूर-पुणे रस्त्यावर जीप-ट्रकच्या अपघातात आठ वर्षांचा चिमुरडा ठार
इंदापूर (डोर्लेवाडी ) : सोलापूर जवळील बाळे येथे देवदर्शन करून इंदापूर कडे परत येत असताना जीपने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये एका बालाकाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास सोलापूर-पुणे रस्त्यावरील अरण गावानजीक घडली. पृथ्वी आबासाहेब जागताप (वय ८ झारगडवाडी, ता. बारामती)असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वी हा इंदापूर तालुक्यातील गौतोंडी या ठिकाणी त्याच्या आईच्या मामाच्या मुलाच्या लग्नासाठी तो गेला होता. लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी नवदांपत्य तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले असता पृथ्वी ही त्यांच्याबरोबर देवदर्शनासाठी गेला होता. परंतु, देवदर्शन करून इंदापूर कडे परत येताना जीप (क्र. एम एच ४२ के ६७९९) ने पाठीमागू मालट्रक (क्रमांक के ए ५६ /०१२९) या ट्रक गाडीला पाठीमागून अरण हद्दीत धडक दिल्यामुळे बोलेरो गाडीमध्ये पुढे बसलेला पृथ्वी हा जागीच ठार झाला. या गाडीतील नवरदेव सागर बाळासाहेब यादव , नवरी दीक्षा सागर यादव, काशीनाथ यादव, बाळासाहेब काशिनाथ यादव , राणी आबासाहेब जगताप, वेदांत अनिल शिंदे, साक्षी हौसेराव यादव, रुपाली अनिल शिंदे, सुभद्रा महादेव यादव, महादेव शंकर यादव हे सर्वजण जखमी झाले आहेत. परंतु पृथ्वी वरती काळाने घाला घातल्याने संपुर्ण झारगडवाडी येथील पृथ्वीच्या कुटुंबावर व संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.