शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अबाधित बंधुतेसाठी शिक्षण हेच अवजार

By admin | Updated: January 18, 2015 01:30 IST

राष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या शासनाने नटलेल्या देशाचे ऐक्य अबाधित राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी शासनाच्या हाती शिक्षण हे अवजार आहे.

पुणे : राष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या शासनाने नटलेल्या देशाचे ऐक्य अबाधित राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी शासनाच्या हाती शिक्षण हे अवजार आहे. सरकारने समतेवर आधारलेल्या राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा नियोजनपूर्वक वापर केला पाहिजे, असे डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी सांगितले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने १६वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, भाई वैद्य, अ‍ॅड. प्रमोद गुजर, प्रकाश रोकडे, डॉ. विकास आबनावे, शंकर आथरे, डॉ. भीम गायकवाड, महेंद्र भारती उपस्थित होते. या वेळी अशोक विद्यालयापासून संमेलनस्थळापर्यंत राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा काढण्यात आली. विविध वर्तमानपत्रांप्रमाणे बंधुता ही या संमेलनाची भाषा आहे. ही भेदाची नाही तर शांतीची, फाडण्याची नाही तर जोडण्याची भाषा आहे, असे रोकडे म्हणाले. आपण जोवर एकमेकांशी मराठीत बोलत आहोत, तोवर मराठी भाषा संपणार नाही; परंतु बंधुतेच्या भाषेची चिंता आहे. आज बंधुतेवर साहित्य लिहिण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. बंधुतेशिवाय काही जवळचे नसते. त्या बंधुतेच्या प्रेरणेतूनच सहकार्य मिळते, असे मत स्वागताध्यक्ष गुजर यांनी व्यक्त केले. अशोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘खरा तो एकचि धर्म’ गीत सादर केले. कवी उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)४कायदा-सुव्यवस्था ही केवळ सार्वजनिक शांततेच रक्षण करणारी फौज नव्हे, तर जाती-धर्मांच्या पलीकडे जाऊन व्यक्तीच्या मानवाधिकाराची राखण करणारी संवेदनक्षम आणि पारदर्शी यंत्रणा बनली पाहिजे. मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा आणि विहारांमधून सामाजिक समतेच्या प्रार्थना झाल्या पाहिजेत. ही राष्ट्रउभारणीची खरी पायवाट आहे, असे लिंबाळे यांनी सांगितले.