शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाने दडविला शिक्षणाधिकारी भरती घोटाळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2015 00:47 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या बहुसंख्य उमेदवारांनी चुकीची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रे सादर केल्याबाबत तसेच

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या बहुसंख्य उमेदवारांनी चुकीची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रे सादर केल्याबाबत तसेच शासनास खोटी माहिती देऊन नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवून त्या आधारे शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती मिळवल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावर राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपसचिवांनी शिक्षण आयुक्त व माध्यमिक शिक्षण संचालकांकडे या संदर्भातील अहवाल मागविला होता. मात्र, आयुक्त कार्यालयाकडून अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे शिक्षण विभागच या भरती प्रक्रियेचा घोटाळा दडवत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.नोव्हेंबर २0१0 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षणाधिकारी व तत्सम पदाच्या भरतीसाठी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते. मात्र, बहुतांश उमेदवारांनी चुकीची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविली असल्याची तक्रार डी. के. गुंजाळ यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. त्यावर राज्याचे उपसचिव आर. पी. आटे यांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करून संबंधित उमेदवारांची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, असे आदेश दिले होते. मात्र, एक वर्ष उलटून गेले तरीही माध्यमिक शिक्षण विभागाने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत.एमपीएससीकडे ३२ उमेदवारांनी चुकीची व खोट्या माहितीच्या आधारे तयार केलेली नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केली असल्याचा दावा गुंजाळ यांनी केला आहे. तसेच मागासवर्गीय गटातील उमेदवारांना खुल्या गटातील राखीव जागांमधून नियुक्ती मिळाली आहे. परिणामी खुल्या गटातील गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय होत आहे, असे पत्र गुंजाळ यांनी मुख्यमंत्री, शिक्षण आयुक्त यांच्याकडे दिले आहे.आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांची तपासणी न करता या उमेदवारांना संबंधित पदावर नियुक्ती देण्याबाबत शासनाकडे शिफारस केली जाते. तसेच शासनाकडूनही या उमेदवारांच्या कागदपत्रांची तयासणी केली जात नाही. परिणामी खोटी प्रमाणपत्र सादर करून उमेदवार नोकरीत रुजू होत असल्याचे गुंजाळ यांनी केलेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे.