शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात लवकरच धावणार ई-बस

By admin | Updated: April 16, 2017 04:15 IST

शहरात लवकरच बॅटरीवर चालणाऱ्या ई-बस सुरू करण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर अशा ३ बस ९० दिवस सुरू करण्यात येतील. याशिवाय, ५०० वातनुकूलित

पुणे : शहरात लवकरच बॅटरीवर चालणाऱ्या ई-बस सुरू करण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर अशा ३ बस ९० दिवस सुरू करण्यात येतील. याशिवाय, ५०० वातनुकूलित बसही खरेदी करण्यात येणार आहेत. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला कंपनीचे अध्यक्ष तथा नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, कार्यकारी संचालक तथा आयुक्त कुणाल कुमार, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, तसेच महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे हे पदसिद्ध संचालक व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर व शिवसेनेचे संजय भोसले उपस्थित होते. नव्याने पदाधिकारी झालेल्या संचालकांच्या नावाला सुरुवातीला मान्यता घेण्यात आली. काँग्रेसच्या वतीने धंगेकर यांचे नाव देण्यात आले असल्याची माहिती मंडळाला देण्यात आली.त्यानंतर मागील बैठकीचे इतिवृत्त, कंपनीचे हिशेब आदी विषय घेण्यात आले. ई-बससाठी एकूण १६ कंपन्यांनी प्रस्ताव दिला असल्याची माहिती कुणाल कुमार यांनी दिली. त्यांपैकी ११ कंपन्या या वेळी उपस्थित होत्या. त्यांनी आपण या ई-बस पुरवू शकतो, अशी ग्वाही दिली. प्रायोगिक तत्त्वावर सलग ३ महिने ३ बस सुरू करून पाहाव्यात व नंतर त्याबाबत निर्णय घ्यावा, असे संचालक मंडळाच्या बैठकीत ठरले. तशी तयारी ३ कंपन्यांनी दर्शविली’ मात्र कंपनीने बॅटरी चार्जिंगसाठी वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी) सौरउर्जेचा पर्याय मुंबई महापालिकेने घेतलेल्या वातानुकूलित बस बंद केल्या आहेत, त्याची कारणे शोधावीत, अशी सूचना चेतन तुपे यांनी केली. बॅटरी चार्जिंगसाठी वीज वापण्याऐवजी सौरऊर्जा वापरता येते, त्याचाही अभ्यास करावा असेही तुपे यांनी सुचविले. कंपन्यांनी त्याला मान्यता देऊन त्याविषयाची माहिती सादर करू, असे सांगितले.पीएमपीच्या माध्यमातून त्यांना वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. यासाठी या कंपन्यांनी प्रत्येक बसला १ लाख ५० हजार खर्च प्रतिमहा सांगितला. तो कमी करून १ लाख करण्यात आला. तशी तयारी त्यांनी दाखवली. ३ बससाठीचे ३ लाख रुपये याप्रमाणे ३ महिन्यांचे ९ लाख रुपये पीएमपी खर्च करणार आहे. या बसचा ३ महिन्यांचा विजेचा खर्चही त्यांनीच स्वतंत्र मीटर बसवून करायचा आहे. या बस कोणत्या मार्गावर ठेवायच्या, याचा निर्णयही पीएमपी व्यवस्थापनानेच घ्यायचा आहे.- बसचे तिकीट नेहमीप्रमाणेच असेल व मिळणारे सगळे उत्पन्नही पीएमपीलाचा मिळेल, असे ठरविण्यात आले. पीएमपीसाठी ५०० वातानुकूलित बस घेण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.