शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएसके डेव्हलपर्स’ला २० डिबेंचरचे पैसे परत द्यावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डिंबेचर्स स्वरूपात सहा वर्षांच्या मुदतीकरिता ठेवलेले पैसे परत न दिल्याप्रकरणी डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : डिंबेचर्स स्वरूपात सहा वर्षांच्या मुदतीकरिता ठेवलेले पैसे परत न दिल्याप्रकरणी डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीला २० डिबेंचरचे प्रत्येकी पाच हजार असे एकूण एक लाख रुपये आणि त्यावरील दहा टक्के व्याजाने ४३ हजार रुपये परत देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. याबरोबरच तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्यासही सांगण्यात आले आहे.

डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड आणि बांधकाम व्यवसायिक दिलीप सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरोधात आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य संगीता देशमुख आणि क्षितीजा कुलकर्णी यांनी हा आदेश दिला आहे. याबाबत बाजीराव शंकर मगदूम आणि त्यांची पत्नी वर्षा यांनी अँड. श्रीराम करंदीकर यांच्यामार्फत डीएसके डेव्हलपर्स लि. आणि डीएसके यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांनी ६ सप्टेंबर २०१४ रोजी प्रत्येकी पाच हजार रुपये किंमतीचे २० डिंबेचर सहा महिन्याच्या मुदतीसाठी ठेवले होते. मुदतपूर्ती दिनांकापूर्वी तक्रारदारांना पैशाची आवश्‍यकता असल्याने तक्रारदारांनी १ डिसेंबर २०१८ रोजी कायदेशीर नोटीस बजावून पंधरा दिवसांच्या आत रक्कम देण्याची मागणी केली. मात्र, ती रक्कम परत देण्यात आली नाही.

त्यामुळे तक्रारदारांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. नोटीस बजावल्यानंतर डीएसके डेव्हलपर्स आणि डीएसकेंच्या वतीने कोणीही मंचात हजर राहिले नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या बाजूच्या युक्तीवादानंतर मंचाने वरील आदेश दिला. तक्रारदार आणि जाब देणार यांच्यात सहा सप्टेंबर २०१४ ते सहा मार्च २०२० या कालावधीसाठी २० डिबेंचरच्या एक लाख रुपयांसाठी करार झाला होता. करारातील अटी, शर्तीनुसार डिबेंचर रक्कम मुदतपूर्व मागण्याचा अधिकार तक्रारदारांना असल्याचे नमूद आहे. मात्र, नोटीस बजावूनही ही रक्कम देण्यात आली नाही. हा अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब असल्याचा निष्कर्ष काढत ग्राहक मंचाने हा आदेश दिला आहे.