वानवडीत मद्यधुंद महिलेकडून धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:42 IST2025-02-15T16:41:16+5:302025-02-15T16:42:05+5:30
महिलेचे वर्तन बघून परिसरात गर्दी जमली.

वानवडीत मद्यधुंद महिलेकडून धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल
- किरण शिंदे
पुणे - वानवडी येथील जगताप चौकात शनिवारी मध्यरात्री एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करत त्या महिलेने परिसरात गोंधळ घातला. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण केला असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायलर झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे वर्तन बघून परिसरात गर्दी जमली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही स्थानिकांनी पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत वानवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यातील वानवडीत मद्यधुंद महिलेकडून धिंगाणा#Pune#vanvadi#womenpic.twitter.com/7aeORkSL7K
— Lokmat (@lokmat) February 15, 2025
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, सार्वजनिक ठिकाणी अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.