शिरूरमध्ये नशेचं प्रमाण वाढतंय; आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्नशील, तब्बल २ कोटींचे ड्रग्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:10 IST2026-01-19T12:09:56+5:302026-01-19T12:10:16+5:30

पोलिसांनी छापा टाकून १ किलो ५२ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे २ कोटी १० लाख रुपये आहे

Drug abuse is increasing in Shirur; Police are trying to curb it, drugs worth 2 crores seized | शिरूरमध्ये नशेचं प्रमाण वाढतंय; आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्नशील, तब्बल २ कोटींचे ड्रग्ज जप्त

शिरूरमध्ये नशेचं प्रमाण वाढतंय; आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्नशील, तब्बल २ कोटींचे ड्रग्ज जप्त

शिरूर : शिरूर शहरात तसेच तालुक्यात युवकांमध्ये एमडी ड्रग्जच्या नशेचे प्रमाण वाढत चालले आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिरूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली आहे. शिरूर परिसरातील बाबूरावनगर येथे शनिवारी (दि. १७) मध्यरात्री छापा टाकून १ किलो ५२ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे २ कोटी १० लाख रुपये आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शादाब रियाज शेख (वय ४१, रा. शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) आहे.

शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. शिरूर परिसरातील बाबूरावनगर येथे ड्रग्ज विक्रीसाठी एकजण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या परिसरात सापळा रचून, संशयिताला अडवून पाहणी केली असता, त्याच्याकडील बॅगेत एमडी ड्रग्ज आढळून आले. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शिरूर तालुक्यातील अमली पदार्थ विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो, अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ही कारवाई विभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पंडित मांजरे, पोलिस हवा. नीलेश शिंदे, जनार्दन शेळके, तुषार पंधारे, राजू मोमीन, संजय जाधव तसेच मुख्यालय पुणे येथील पोलिस कॉन्स्टेबल पोपट गायकवाड, शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार, अंबादास थोरे, सचिन भोई आणि अन्य अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

Web Title : शिरूर में नशीली दवाओं पर कार्रवाई: 2 करोड़ रुपये की ड्रग्स जब्त, एक गिरफ्तार

Web Summary : शिरूर पुलिस ने 2.1 करोड़ रुपये की एमडी ड्रग्स जब्त की, शादाब शेख नामक एक व्यक्ति को गिरफ्तार किया। बाबूरावनगर में युवाओं में बढ़ते नशीली दवाओं के उपयोग को लक्षित करते हुए छापा मारा गया। ड्रग रैकेट का पता लगाने के लिए जांच जारी है।

Web Title : Shirur Crackdown: Police Seize ₹2 Crore Worth of Drugs, One Arrested

Web Summary : Shirur police seized ₹2.1 crore worth of MD drugs, arresting one person, Shadab Sheikh. The raid in Baburavnagar targeted rising drug use among youth. An investigation is underway to uncover the drug racket.