शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोलापुरला : विभागातील टँकरची संख्या ६०० वर          

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 18:49 IST

पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असून सोलापूरात ३ लाख ३६ हजार ८६२ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत.

ठळक मुद्दे१ लाख ३८ हजार ७३७ पशुधन दुष्काळाने बाधित येत्या मे व जून मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होईल, असे स्थिती

पुणे : पुणे विभागातील दुष्काळाने बाधित झालेल्या नागरिकांची संख्या ११ लाख २ हजारावर गेली असून १ लाख ३८ हजार ७३७ पशुधन दुष्काळाने बाधित झाले आहे. बुधवारपर्यंत (दि.१०) पुणे विभागातील टँकरची संख्या सुमारे ६०० पर्यंत वाढली आहे.त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे  साताऱ्यात १५१, सांगलीत १६२, तर सोलापूरात १७७ टँकर सुरू आहेत. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच ६०० टँकर सुरू करावे लागत आहेत. त्यामुळे येत्या मे व जून मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होईल, असे स्थिती आहे.पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असून सोलापूरात ३ लाख ३६ हजार ८६२ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत. तर सांगली जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार ४८९ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत. तर साताºयातील बाधितांची संख्या २ लाख ३८ हजार १५१  वर गेली आहे. पुणे जिल्ह्यात १ लाख ९३ हजार ४२५ नागरिकांना दुष्काळामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.पुणे विभागात दुष्काळाने ५२१ गावे आणि 3 हजार ४७७ वाड्या बाधित झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील टँकरने शंभरी ओलांडली असून जिल्ह्यात सध्या १०७ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या कोल्हापूर वगळता सर्व जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ९५ टँकरने सुरू असून सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात ९१ टँकर सुरू आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात सध्या मंगळवेढ्यातील नागरिकांना ५१ तर सांगोल्यातील नागरिकांना ३७ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ---  जिल्हा व तालुका निहाय टँकरची आकडेवारी पुढील प्रमाणे:  सोलापूर : सांगोला ३१, मंगळवेढा ५१, माढा १०, करमाळा २६, माळशिरस ८, मोहोळ ४, दक्षिण सोलापूर १७, उत्तर सोलापूर ९, अक्कलकोट ४ व बार्शी ५. पुणे : आंबेगाव ११, बारामती २६, दौंड ११, हवेली ३, इंदापूर २, जुन्नर ९, खेड ५, पुरंदर १२, शिरूर २१ व वेल्हा १.  सातारा : माण ९१, खटाव २२, कोरेगाव २५, फलटण १०, वाई ५, खंडाळा  १, पाटण १सांगली : जत ९५, कवठेमहाकाळ १०, तासगाव ८, खानापूर १४, आटपाडी २९.

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरीdroughtदुष्काळWaterपाणी