दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोलापुरला : विभागातील टँकरची संख्या ६०० वर          

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 06:45 PM2019-04-10T18:45:56+5:302019-04-10T18:49:23+5:30

पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असून सोलापूरात ३ लाख ३६ हजार ८६२ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत.

drought full condition in the Solapur: The number of tankers in division is 600 | दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोलापुरला : विभागातील टँकरची संख्या ६०० वर          

दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोलापुरला : विभागातील टँकरची संख्या ६०० वर          

googlenewsNext
ठळक मुद्दे१ लाख ३८ हजार ७३७ पशुधन दुष्काळाने बाधित येत्या मे व जून मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होईल, असे स्थिती

पुणे : पुणे विभागातील दुष्काळाने बाधित झालेल्या नागरिकांची संख्या ११ लाख २ हजारावर गेली असून १ लाख ३८ हजार ७३७ पशुधन दुष्काळाने बाधित झाले आहे. बुधवारपर्यंत (दि.१०) पुणे विभागातील टँकरची संख्या सुमारे ६०० पर्यंत वाढली आहे.त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे  साताऱ्यात १५१, सांगलीत १६२, तर सोलापूरात १७७ टँकर सुरू आहेत. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच ६०० टँकर सुरू करावे लागत आहेत. त्यामुळे येत्या मे व जून मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होईल, असे स्थिती आहे.
पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असून सोलापूरात ३ लाख ३६ हजार ८६२ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत. तर सांगली जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार ४८९ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत. तर साताºयातील बाधितांची संख्या २ लाख ३८ हजार १५१  वर गेली आहे. पुणे जिल्ह्यात १ लाख ९३ हजार ४२५ नागरिकांना दुष्काळामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पुणे विभागात दुष्काळाने ५२१ गावे आणि 3 हजार ४७७ वाड्या बाधित झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील टँकरने शंभरी ओलांडली असून जिल्ह्यात सध्या १०७ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या कोल्हापूर वगळता सर्व जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ९५ टँकरने सुरू असून सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात ९१ टँकर सुरू आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात सध्या मंगळवेढ्यातील नागरिकांना ५१ तर सांगोल्यातील नागरिकांना ३७ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. 
--- 
 जिल्हा व तालुका निहाय टँकरची आकडेवारी पुढील प्रमाणे:  
सोलापूर : सांगोला ३१, मंगळवेढा ५१, माढा १०, करमाळा २६, माळशिरस ८, मोहोळ ४, दक्षिण सोलापूर १७, उत्तर सोलापूर ९, अक्कलकोट ४ व बार्शी ५.
 पुणे : आंबेगाव ११, बारामती २६, दौंड ११, हवेली ३, इंदापूर २, जुन्नर ९, खेड ५, पुरंदर १२, शिरूर २१ व वेल्हा १.
  सातारा : माण ९१, खटाव २२, कोरेगाव २५, फलटण १०, वाई ५, खंडाळा  १, पाटण १
सांगली : जत ९५, कवठेमहाकाळ १०, तासगाव ८, खानापूर १४, आटपाडी २९.

Web Title: drought full condition in the Solapur: The number of tankers in division is 600

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.