शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारीने वाहने चालवावीत

By admin | Updated: January 26, 2017 00:20 IST

स्वत:चा आणि जवळच्या व्यक्तीचा जीव अत्यंत मोलाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वाहने चालवावीत असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मांडले.

रावेत : स्वत:चा आणि जवळच्या व्यक्तीचा जीव अत्यंत मोलाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वाहने चालवावीत असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मांडले. रस्ता सुरक्षा अभियान २०१७ अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड आणि प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी यांच्या विद्यमाने आयोजित समारोप समारंभात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या, ‘‘ड्रायव्हिंग हे आपले पॅशन आहे. परंतु वाहन चालविताना मी वाहतुकीच्या नियमांचे पालन करते. आपल्या जवळच्या व्यक्तीचे अपघाताने अकस्मात जाण्याचा अनुभव घेतलेला आहे. अशी वेळ आपल्यावर येऊ नये.’’उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड आणि प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०१७ या कार्यक्रमाच्या समारोप समारंभी बाबासाहेब आजरी प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे विभाग, अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, विनोद चव्हाण सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार मोहनराव देशमुख, मोटार वाहन निरीक्षक चंद्रकांत माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते. प्रास्ताविक करताना सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. तसेच या रस्ता सुरक्षा अभियानामागे असणारी भूमिका सांगून या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी आणि अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या एकाच उद्देशाने हे कार्यक्रम घेतले जात असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. (वार्ताहर)