'एफटीआयआय'मध्ये येण्याचं स्वप्न आज पूर्ण झालं : लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 09:51 PM2021-08-06T21:51:00+5:302021-08-06T21:52:59+5:30

लष्कर आणि समाज यांच्यात एक बंध निर्माण करण्यात चित्रपटांची भूमिका महत्वाची: लष्करप्रमुख मनोज नरवणे

The dream of completed to joining FTII came true today: The sentiments of Army Chief Manoj Narwane | 'एफटीआयआय'मध्ये येण्याचं स्वप्न आज पूर्ण झालं : लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची भावना

'एफटीआयआय'मध्ये येण्याचं स्वप्न आज पूर्ण झालं : लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची भावना

Next

पुणे : 'एफटीआयआय'मध्ये येण्याचे स्वप्न आज पूर्ण झालं असून पुण्याला भेट देताना ‘नॉस्टेल्जिक’ झाल्यासारखं होतं. पुण्याशी खूप आठवणी निगडित आहेत. माझ्या दोन्ही आजोबांचे घर हे प्रभात रस्ता आणि कर्वे रस्त्याला होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन्ही आजोबांकडे चालत जात असे. त्यामुळेच मला ‘पैदल’ सेनेमध्ये पाठवले अशी मिश्कील टिप्पणी करीत, नेहमीच येता-जाता एफटीआयआयचे दर्शन घडायचे. एवढांच माझा काय तो एफटीआयआयशी संबंध आला. आज संस्थेत प्रथमच आलो आहे. एफटीआयआयआयमध्ये येण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. इथे आल्यानंतर ऐतिहासिक प्रभात स्टुडिओ आणि परिसर पाहून खूपच भारावून गेलो असल्याची भावना मनोज नरवणे यांनी व्यक्त केली.

’युद्धांवर आधारित चित्रपटांनी प्रेक्षक मनावर विशेषत: तरूण पिढीवर नेहमीच प्रभाव टाकला आहे. या चित्रपटांमुळे जवानांनी देशासाठी केलेला त्याग, त्यांच्याप्रती आत्मीयतेची भावना आणि देशाप्रती अभिमान जागृत होण्यास मदत झाली आहे. खडतर काळात सैनिकांनी जीवाची बाजी लावत केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकून दूरचित्र वाहिन्यांनी देखील अनेक तरूणांना लष्करी सेवेमध्ये रूजू होण्यास प्रोत्साहित केले आहे. लष्कर आणि समाज यांच्यात एक बंध निर्माण करण्यात चित्रपटांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. याबददल मनोरंजन क्षेत्राचा मी ॠणी आहे, अशी भावना लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केली.

 

’राष्ट्र सध्या आव्हानात्मक कालखंडातून जात आहे. कोरोना साथीच्या काळात सक्रीय आणि अस्थिर अशा पश्चिम आणि ईशान्य भागातील सीमेवर काही घडामोडींनी अस्वस्थता निर्माण झाली आहे. तरी भारतीय सैन्यदल अशी आव्हाने पेलण्यासाठी सक्षम आहे. युद्ध कधी दोन सैन्यदलात होत नाही तर ते दोन राष्ट्रांमध्ये होते. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी देशातील नागरिकांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या दूरचित्रवाणी विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात जनरल नरवणे बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल,ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे, एफटीआयआयचे संचालक भुपेंद्र कँथोला, दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता प्रा. संदीप शहारे या वेळी उपस्थित होते. दूरचित्रवाणी विभागाच्या इमारतीला पु. ल. देशपांडे यांचे नाव देण्यात आले आहे. या इमारतीबाहेर पुलंच्या भित्तिचित्राचे अनावरण जनरल नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ. जब्बार पटेल, सई परांजपे तसेच दूरचित्रवाणी विभागाचे माजी अधिष्ठाता प्रा. एस. पी. भाटेकर, प्रा. समर नखाते, डॉ. इफ्तिकार अहमद, प्रा. राजेंद्र पाठक, प्रा.जयश्री कनल, प्रा.आशुतोष कविश्वर, सध्याचे अधिष्ठाता प्रा. संदीप शहारे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच एफटीआयआयच्या  ‘लेन्साइट’ या नियतकालिकाच्या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. नरवणे यांनी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल देशपांडे यांचा गौरव केला. पुलं हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पुस्तकातील अनेक व्यक्तिरेखांनी वाचकांच्या चेह-यावर हसू उमटविले. त्यांच्या योगदानाची दखल एफटीआयआयने घेणे कौतुकास्पद आहे. पी. कु मार वासुदेव आणि वसंत मुळे ही दूरचित्रवाणी क्षेत्रातील मोठी व्यक्तिमत्त्वे होती. देशात दूरचित्रवाणीची सुरुवातीच्या काळात जडणघडण होण्यात या तिघांचाही महत्त्वाचा वाटा आहे असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो.  समाजात घडणा-या विविध घडामोडींचे संवेदनशीलपणे चित्रण करण्याबरोबरच  समाजाला हादरवून टाकण्याचे सामर्थ्य देखील चित्रपटांमध्ये आहे. हुंडाबळी, ऑनर किलिंग, आरक्षण,लैगिंक  शोषण, धार्मिक असहिष्णुता असे विविध प्रश्न हाताळणाºया चित्रपटांमध्ये समाजाचे प्रतिबिंब दिसते. एफटीआयआयला दृकश्राव्य माध्यमामध्ये  ‘सेंट्रल ऑफ एक्सलन्स’ चा दर्जा आहे. भारतीय समाज आणि संस्कृतीमध्ये एफटीआयआयचे अनन्यसाधरण योगदान आहे. राष्ट्रीय आणि आंतरराट्रीय स्तरावर संस्थेचा नावलौकिक आहे. संस्थेने संकट काळातही समाजात मूल्य, संस्कृतीची विविधता रूजविण्याचे केलेले काम दुर्लक्षित करता येणार नाही अशा शब्दांत त्यांनी संस्थेविषयी कौतुकोद्गार काढले.

डॉ. पटेल म्हणाले, पुलंचे एफटीआयआयशी विशेष नाते होते.‘नाच रे मोरा’ या गाण्याचे ध्वनिमुद्रण एफटीआयआयच्या स्टुडिओतच के ले होते. लेखन स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्याचे पुलं पुरस्कर्ते होते. पुलंच्या ‘तुज आहे तुजपाशी’ नाटकात मला ‘श्याम’ ही भूमिका करण्याची संधी मिळाली.‘घाशीराम कोतवाल’ पाहून पुलंनी   ‘तीन पैशाचा तमाशा’ दिग्दर्शित करण्याविषयी विचारले. तसेच चित्रपट सोडल्यानंतर ३९ वर्षांनी त्यांनी मला ‘एक होता विदूषक’  हा चित्रपट लिहून दिला. परांजपे यांनी पुलंच्या रेडिओपासूनच्या आठवणी, चित्रपट संस्थेमध्ये दूरचित्रवाणी विभागाची झालेली स्थापना याच्या आठवणी सांगितल्या.


साचेबद्धता टाळा... 
चित्रपटांमधील लष्कर अधिका-यांच्या साचेबद्ध भूमिका काहीशा खटकतात. सुंदर अभिनेत्रीचा बाप खडूस कर्नल तरी असतो. सिल्क चा कुडता, एका हातात ‘व्हिस्की’ चा ग्लास आणि दुस-या हातात ‘शॉर्टगन’ असते. कल्पकता दाखविण्याचा परवाना मिळाला आहे, हे  समजू शकतो अशी मिश्कील टिप्पणी करीत,चित्रपटात लष्करी अधिका-याबददल काल्पनिकता दाखविताना विचार करायला हवा. भविष्यात ही साचेबद्धता दिसणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: The dream of completed to joining FTII came true today: The sentiments of Army Chief Manoj Narwane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.